मुंबई बातम्या

Lampi: लम्पीचा धोका वाढला; मुंबई नियंत्रीत क्षेत्र घोषित – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : प्राण्यांमधील लम्पी त्वचा रोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला नियंत्रीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. शहरात प्राण्यांची ने-आण करण्यावर राज्य सरकारने बंदी घालण्यात आली आहे. तसेच अशा प्राण्यांचा बाजार भरवणे, प्रदर्शन करणे यावरही बंदी घालण्यात आहे.

(Lampi Disease Latest Updates)

मात्र, लम्पी रोगाचा प्रसार वाढत असताना वांद्रेच्या निर्मल नगर पोलीस ठाणे परिसरात छुप्या पद्धतीने जनावरांची कत्तल करून त्यांच्या मांसाची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या छुप्या कत्तल खान्यापासून हाकेच्या अंतरावर पोलिसांची चौकी असून त्यांना याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. तर पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाल्यावर प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी या कत्तलखान्यावर छापा टाकला.

हेही वाचा: Ashok Gehlot : राजस्थानातही शिंदे पॅटर्न! 92 काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची हाक

या कत्तलखान्यावर छापा टाकला त्यावेळी कत्तल खान्यात मोठ्या प्रमाणात मांस टेम्पोत ठेवले जात होते. कारवाईची कुणकुण लागताच तेथून नागरिकांनी पळ काढल्याची माहिती आहे.

दरम्यान प्राणी कल्याण अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून निर्मल नगर पोलिसांनी 188, 429 भादवि सह कलम 9(अ), 5 (क), प्राणी संरक्षण अधि. सह कलम 66(क) या अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Mumbai Lampi Restricted Area Announced Meat Transport Police

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-lampi-restricted-area-announced-meat-transport-police-drl98