शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. तर शिंदे गटानेही दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क कुणाचं याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे. 22 तारखेपर्यंत मुंबई पालिका दोन्ही गटांच्या अर्जांना उत्तर देऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
(मुख्यमंत्री शिंदे निघाले दिल्लीला, फॉक्सकॉन प्रकल्पासाठी घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट)
दसरा मेळावा कोण घेणार या मुद्द्यावरुन होणारं राजकारण आणि वाढता दबाव पहाता महापालिका निर्णयाकरता आणखी २ दिवस घेणार आहे. शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार असल्याने कोणत्याच गटाला परवानगी दिली जाऊ नये असं मत पालिका अधिकाऱ्यांच्या चर्चेत मांडले जात आहे.
दरम्यान, शिंदे गटाने बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितली होती. याबद्दल शिंदे गटाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिंदे गटाने शिवतीर्थासाठी अर्ज दाखल केलेला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला आवाहन केले आहे. ‘आपला देश संविधानावर चालतो. हा आलेला निर्णय त्यांनी लढाऊ वृत्तीने स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. प्रशासक आहेत त्यामुळे ते कारवाई करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यंमत्री शिंदे हे कायद्याला माणणारे आहे असे मी मानते. काही लोक समीकरण बदलू पहात आहे. गेली ५६ वर्ष हा दसरा मेळावा सुरू आहे. लोक बाळासाहेबांना बघण्यासाठी येत होते तिथून बाळासाहेबांनी उद्धवजी आणि आदित्यबद्दल सांगितले होते, असं भावनिक आवाहन पेडणेकर यांनी केलं.
‘कायदा सुव्यवस्था बिघडू नये. हेच आम्हाला वाटते. त्यामुळे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आम्हाला परवानगी द्यावी असे आम्हाला वाटते, असंही पेडणेकर म्हणाल्या.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source: https://lokmat.news18.com/maharashtra/bmc-to-decide-after-two-days-on-permission-for-dussehra-melva-at-shivaji-park-mhss-763213.html