मुंबई बातम्या

मुंबई : पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली – Loksatta

मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणचे सखलभाग जलमय झाले आणि त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. त्याचा फटका शुक्रवारी सकाळी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना बसला.मुंबईत गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास तो पुन्हा सुरू करण्यात आला. मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, दक्षिणेकडे जाणाऱ्या सिबा मार्ग येथील वाहतूक संथगतीने सुरू होती. तसेच एक फूट पाणी साचल्याने अंधेरी मार्केट येथील वाहतूक बंद करण्यात आली. जे. जे पुलाच्या उतरणीवर मोटारगाडी बंद पडल्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीची गती मंदावली होती.

हेही वाचा >>> ठाण्यात मुसळधार पाऊस

कर्नाक पूल बंद असल्याने दक्षिण दिशेने जाणाऱ्या अवतार सिंग बेदी वाडीबंदर या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. याशिवाय पूर्व द्रुतगती महामार्गावर टॅक्सी बंद पडल्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. पूर्व मुक्त मार्गावर वडाळा परिसरात वाहतूक धीम्यागतीने सुरू होती. त्यामुळे भक्ती पार्क, जिजामाता नगरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-road-traffic-slowed-down-due-to-rain-mumbai-print-news-amy-95-3131978/