मुंबई, 13 सप्टेंबर : मुंबई महापालिकेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तशा राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेत नगरसेवक होणे म्हणजे एक आमदार झाल्यासारखं आहे. (Mumbai municipal MNS) यामुळे महापालिकेत निवडूण येण्यासाठी उमेदवार कोणत्याही अमिषाला बळी पडण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार घडला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आमिष दाखवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गिरगावात घडली आहे.
वृशांक वडके असे या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव असून व्ही. पी. मार्ग पोलिसांनी त्याला बलात्कार आणि धमकावल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पुढील दोन-तीन महिन्यात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सगळेच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची शक्यता आहे. तसेच, या निवडणुकीच्या तिकीटासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मनसेचा विभागप्रमुख असलेल्या गिरगावातील रहिवासी वडके याने यातील 42 वर्षीय पीडित महिलेला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तिकिट देण्याचे आश्वासन दिले होते.
हे ही वाचा : आशिष शेलार पेंग्विन ट्वीटवरून जोरदार ट्रोल, नेटकरी म्हणतात जनाब आशिष शेलार उर्फ कुरेशी मियां
पक्षाकडून उमेदवारी देण्याच्या बहाण्याने वडके याने सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 या दरम्यानच्या काळात बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
पुण्यातील घटनेने हळहळ
वडिलांना धमकवत घरात घुसून युवतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न एका माथेफिरूनं केला. धक्कादायक प्रकार म्हणजे हा व्यक्ती नग्नावस्थेत होता. त्याने घरात घुसून वडिलांना शिवीगाळ केला आणि धमकी दिली. आत्यावर हल्ला केला ज्यामध्ये ती जखमी झाली. युवतीचा विनयभंग केला.
हे ही वाचा : महाविकास आघाडीला औरंगाबाद कोर्टाचा दणका, शिर्डी विश्वस्त मंडळ बरखास्त
ही धक्कादायक घटना पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 9 सप्टेंबरच्या रात्री अचानक 27 वर्षांचा तरुण नग्नावस्थेत एका घरात जबरदस्तीने घसला. त्याने लज्जास्पद कृत्य केलं. ज्यामुळे कुटुंबातील लोकांना किळसवाणं वाटलं. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केला आणि धमकी दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:Sandeep Shirguppe
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source: https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai-municipal-mns-leader-vrushant-wadak-raped-a-woman-760178.html