एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सायन-ट्रॉम्बे रोडवरील सुधारगृहातून सुमारे १५-१७ वयोगटातील सहा मुलींनी खिडकीचे ग्रील दगडाने फोडून पळ काढला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीवरून, त्यांना पळून जाण्यास कोणीतरी मदत केली होती. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा दोन्ही मुली स्वेच्छेने सुधारगृहात परतल्या. अन्य चार मुलींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सुधारगृहातून पळून जाणाऱ्या मुलींच्या संदर्भात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलीस या घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे.
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/six-minor-girls-escaped-from-govt-girls-hostel-two-girls-came-back-in-few-hours/articleshow/94168813.cms