मुंबई बातम्या

Mumbai : अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूकीत बदल – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई – येत्या 4 आणि 5 सप्टेंबर 2022 रोजी पूर्व नियोजित VVIP दौऱ्यांमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मुंबईतील काही भागातील रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने होईल, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: रस्त्यात बंद पडलेल्या लाल परीला आमदार लंकेंनी दिला धक्का; व्हिडीओ व्हायरल

४ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १०.३० या वेळेत सहर, बांद्रा, वरळी सी लिंक, हाजीअली कँप कॉर्नर, बाबुलनाथ आणि मलबार हिल परिसरातील वाहतूक संथ राहणार आहे.

तसेच ५ सप्टेंबर सोमवारी सकाळी ९ ते १२.३० या कालावधीत मलबार हिल, बाबुलनाथ, कँप कॉर्नर, हाजीअली, महालक्ष्मी रेस कोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन, लालबाग परेल, लोटस जंक्शन, वरळी डेअरी, वरळी सी लिंक आणि लिलावती जंक्शन परिसरातली वाहतूक संथ राहणार आहे.

या व्यतिरिक्त २ ते ३ या एक तासाच्या कालावधीत मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह आणि रिगल जंक्शन कोलाबा परिसरातील वाहतूक संथ राहणार आहे. तर ३ ते सांयकाळी ६ पर्यंत मरोल ते पवई परिसरातील वाहतूक संथ राहणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. मंत्री शहा ४ सप्टेंबर रोजी रात्री मुंबईत दाखल होणार आहे. तर ५ सप्टेंबर रोजी ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे.

Web Title: Due To A Pre Scheduled Vvip Visit Mumbai Traffic Movement Will Be Slow

Source: https://www.esakal.com/mumbai/due-to-a-pre-scheduled-vvip-visit-mumbai-traffic-movement-will-be-slow-rad88