मुंबई बातम्या

ऐन गणेशोत्सवात मोठी कारवाई! मुंबई विमानतळावरुन 13 कोटींचे ड्रग्स जप्त, एकाला अटक, पोटात लपवले 87… – TV9 Marathi

Mumbai Airport Crime : या अंमली पदार्थांची किंमत तब्बल 13 कोटी रुपये असून यात कोकेनचा समावेश आहे. एकूण 87 कोकेनचे कॅप्सून जप्त करण्यात आले आहेत. मुंबई कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर ही कारवाई केली आहे.

जप्त करण्यात आलेले कॅप्सूल

Image Credit source: TV9 Marathi

मुंबई : मुंबईतून मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थांचा मोठा साठा मुंबई विमानतळावर सापडला आहे. 10 कोटी रुपयांपेक्षाही जास्त किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, असं सांगितलं जातंय. याप्रकरणी एकाला अटकही केली गेली आहे. या अंमली पदार्थांची किंमत तब्बल 13 कोटी रुपये असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यात प्रामुख्याने कोकेनचा समावेश आहे. एकूण 87 कोकेनचे कॅप्सूल जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

मुंबई कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर ही कारवाई केली आहे. एकाला याप्रकरणी अटक करण्यात आलीय. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे. या कारवाईमुळे मुंबई विमानतळावरील बंदोबस्त आणि तपासही आता अधिक कडक करण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवात करण्यात आलेल्या एकच कारवामुळे खळबळ उडालीय. प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळलेल्या अंमली पदार्थांमुळे अनेक शंका आता व्यक्त केल्या जात आहेत. त्याअनुशांगाने पोलिसांकडून तपासही केला जातोय.

[embedded content]

3 दिवसांत खाल्ल्या 87 कॅप्सूल

28 ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळवरील कस्टम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला अटक केली होती. या व्यक्तीला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या व्यक्तीच्या पोटातून एक दोन नव्हे तर तब्बल 87 कोकेनच्या कॅप्सूल बाहेर पडल्या. तीन दिवसात या कोकेनच्या कॅप्सून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने खाल्या होत्या, असंही समोर आलंय. पश्चिम आफ्रिकेतील देश घाना येऊन ही व्यक्ती आलेली होती. जिच्या कडून एक पॅक्सही जप्त करण्यात आलं आहे.

Source: https://www.tv9marathi.com/crime/mumbai-crime/mumbai-aiport-87-capsules-of-drugs-seized-at-chatrapati-shivaji-mumbai-international-airport-from-stomach-of-an-arrested-man-by-custom-department-au136-795358.html