गणेश उत्साहाच्या मुहूर्तावर सिडकोने घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. सदनिका, व्यावसायिक गाळे आणि भूखंड अशी मेगा लॉटरीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 4158 घरं, 245 दुकानं आणि सहा मोठ्या भूखंडांचा देखील समावेश आहे. सिडकोने कार्यालयीन कामकाजासाठी भूखंड जारी केला आहे. यासाठी उद्या ऑनलाईन जाहीरात प्रसिद्ध होणार आहे. तर गुरुवारपासून ग्राहकांना अर्ज करता येतील.
(महाराष्ट्र शासनाचा अजब कारभार, गरजू लाभार्थी वंचित आणि काहींना डबल दिले 50 हजार)
दिवाळीत म्हाडाकडूनही लॉटरी निघणार
दरम्यान, यंदा दिवाळीत मुंबईमध्ये सुमारे चार हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणानं घेतला आहे. त्यासाठीची तयारीदेखील म्हाडानं सुरू केली आहे. म्हाडातर्फे या लॉटरीची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी लवकरच ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांना आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. महिन्याभरात याविषयीची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. या लॉटरीत पहाडी, गोरेगाव येथील 3,015 घरांपैकी अल्प आणि अत्यल्प गटातील 2,683 घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच कोळे-कल्याण, अॅन्टॉप हिल, विक्रोळी इत्यादी ठिकाणच्या घरांचाही समावेश असणार आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:Chetan Patil
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source: https://lokmat.news18.com/maharashtra/cidco-declare-lottery-for-house-and-commercial-shops-in-new-mumbai-mhcp-754003.html