मुंबई बातम्या

मुंबई : दिवसभर ढगाळ वातावरण, मध्यम पावसाची शक्यता – Loksatta

मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी रात्री पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. तर सोमवारी सकाळी काही भागात पावसाची रिमझिम सुरू होती. दरम्यान, दिवसभर ढगाळ वातावरण आणि काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाच्या एक-दोन मोठ्या सरी बरसल्यानंतर दिवसभर कडक उन पडत होते. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. सोमवारी सकाळीही पावसाची रिमझिम सुरू होती.

हेही वाचा >>> शिवसेनेतील फुटीप्रकरणी तातडीने सुनावणीची विनंती

मुंबईत ठिकठिकाणी रविवारी रात्री १२ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत ५ ते ३५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, संपूर्ण दिवसभरात मुंबई शहर व उपनगरात ढगाळ वातावरण असेल आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.२९ ऑगस्ट रोजी गेल्या २४ तासांत कुलाबा येथे १५ मि.मी. आणि सांताक्रूझ येथे १.७ मि.मी. पावसाची नोंद झाली.

Source: https://www.loksatta.com/mumbai/cloudy-all-day-chance-of-moderate-rain-mumbai-print-news-amy-95-3099184/