मुंबई बातम्या

मुंबई टळली मोठी दुर्घटना, पेट्रोल पंपाजवळ फुटली होती गॅसची पाइपलाइन, घटनास्थळाचा VIDEO – News18 लोकमत

मुंबई, 29 ऑगस्ट : मुंबईतील (mumbai) परळ भागामध्ये मोठी दुर्घटना थोडक्यात टळलली आहे. जमिनीखाली असलेली महानगर गॅसची (mahanagar gas pipeline) पाइपलाइन फुटली होती. त्यामुळे या पाइपलाइनला आग लागली होती. मात्र, वेळीच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

मुंबईतील गजबजलेल्या परळ भागात आज दुपारी ही घटना घडली होती. महानगर गॅसची पाइपलाइन फुटल्यामुळे आग लागली होती. एका पेट्रोल पंपाजवळची ही आग लागली होती.

त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.  आग लागल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. अवघ्या काही मिनिटांमध्ये अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जवानांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. मात्र, ही गॅसची पाइपलाइन कशामुळे फुटली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

सिलेंडरच्या गळतीमुळे गॅसचा भडका, 3 जण भाजले

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील पवनीमध्ये सिलेंडर गळतीची घटना समोर आली. सिलेंडरचा रेग्युलेटर सुरू केल्यानंतर थोड्याच वेळात स्वयंपाक खोलीत आगीचा भडका उडला.  यात एकाच घरातील तीन लोक भाजून जखमी झाले आहे. जखमींवर भंडारा सामान्य रुग्णालय उपचार केल्यानंतर नागपुर येथे हलवण्यात आले आहे.

पवनी येथील शुक्रवारी वार्ड निवासी लेकराम रामचंद्र ढेंगरे यांच्या घरी भावना इंडियन गॅस एजेंसीचा सिलेंडर असून यात नेहमी लीकेज असलेल्या सिलेंडरच्या तक्रारी असतात.
दोन दिवसांपूर्वी लेखराम यांनी लिकेजची तक्रार एजेंसीला केली असता एजेंसी मधून इंदूरकर नामक व्यक्ती आला आणि लिकेज दुरुस्त केले. त्यानंतर आज सकाळच्या दरम्यान लेकराम यांनी चहा बनविण्यासाठी रेग्युलेटर सुरू करून शेगडी पेटवण्याकरिता लाइटर चालवले असता स्वयंपाक खोलीत आगीचा भडका उडाला यात लेकराम वय 50 वर्ष भाजले गेले. स्वयंपाक खोलीत आगीचा भडका पाहून पत्नी पुष्पा ढेंगरे (वय 42) आणि मुलगा स्वप्नील ढेंगरे (वय 23) या दोघांनी स्वयंपाक खोलीकडे धाव घेतली आणि ते सुद्धा भाजले गेले. जखमी अवस्थेत तिघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पुष्पा आणि स्वप्नील यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार नागपूर येथे सुरु आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मुंबई

मुंबई

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/mahanagar-gas-pipeline-burst-in-paral-area-of-mumbai-mhss-753254.html