मुंबई बातम्या

Mumbai : भाडेवाढ करा, 15 सप्टेंबरपासून बेमुदत बंद करू, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा इशारा – TV9 Marathi

1 मार्च 2021 झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी 250 ते 300 रुपये जादा मोजावे लागताय. सीएनजीच्या दरात पाच वेळा दरवाढ झाली 

टॅक्सी

Image Credit source: Social Media

मुंबई : आम्हाला भाडेवाढ न मिळाल्यास गणपती उत्सवानंतर (Ganesh Utsav) 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर (Strike) जाऊ, असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे (mumbai taxi union) सरचिटणीस ए.एल क्वाड्रोस यांनी दिला आहे. ‘आम्ही 1 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता. पण, आम्हाला लिखित आश्वासन मिळाल्यानं आम्ही आमचे आंदोलन स्थगित केले. पण आता एक महिना होत आला तरी भाडेवाढीविषयी वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील पत्राला साधी पोचपावतीही मिळत नाही. 1 मार्च 2021 झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी 250 ते 300 रुपये जादा मोजावे लागताय.

हायलाईट्स

 1. महिनाभरात सीएनजीच्या दरात सलग चार ते पाच वेळा दरवाढ झाली
 2. डिझेल आणि सीएनजीचा दर जवळपास एकाच पातळीवर आला
 3. टॅक्सी व रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले
 4. 1 मार्च 2021 रोजी मिळालेल्या भाडेवाढीनंतर सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली
 5. सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये असून यामध्ये दहा रुपयांची वाढ करावी
 6. 1 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता
 7. लिखित आश्वासन मिळाल्यानं आम्ही आमचे आंदोलन स्थगित केले
 8. गणपती उत्सवानंतर 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाऊ, असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा आहे

1 मार्च 2021 झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी 250 ते 300 रुपये जादा मोजावे लागताय.

महत्वाचे मुद्दे

 1. सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये असून त्यात दहा रुपयांची वाढ मिळावी
 2. वाढ न मिळाल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा
 3. मार्च 2021 ला टॅक्सीचे भाडे 22 रुपये झाले
 4. तीन रुपयांची वाढ झाली आणि भाडे 25 रुपयांपर्यंत पोहोचले
 5. रिक्षाचे भाडेही 18 रुपयांवरुन 21 रुपये झाले होते
 6. सध्या सीएनजीचे दर प्रति किलोग्रॅम 80 रुपये आहे.

महिनाभरात सीएनजीच्या दरात सलग चार ते पाच वेळा दरवाढ झाली असून डिझेल आणि सीएनजीचा दर जवळपास एकाच पातळीवर आला असल्याचे क्वॉड्रोस यांनी म्हटले असून टॅक्सी व रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. 1 मार्च 2021 रोजी मिळालेल्या भाडेवाढीनंतर सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये असून यामध्ये दहा रुपयांची वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/vatwad-warning-of-indefinite-closure-from-september-15-au167-790047.html