मुंबई बातम्या

होम लोन पाठोपाठ घरांच्या किमतीही वाढल्या; रिपोर्टनुसार मुंबई, पुण्यातं घर घेणे किती महागलं? – News18 लोकमत

मुंबई, 17 ऑगस्ट : स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना डबल झटका बसला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर आधीच वाढवण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे गृहकर्ज महाग झाले असून आता घरांच्या किमतीही वाढू लागल्या आहेत. एका अहवालानुसार, देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून दरम्यान निवासी मालमत्तेच्या किमतीत 5 टक्के वाढ झाली आहे. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रिअल इस्टेट कंपन्यांची संस्था क्रेडाई, रिअल इस्टेट कन्सल्टंट कॉलियर्स इंडिया आणि लायसेस फोरास यांनी हाऊसिंग प्राइस ट्रॅकर रिपोर्ट 2022 प्रसिद्ध केला आहे. ज्यानुसार मुंबई महानगर प्रदेश, पुणे दिल्ली एनसीआर, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबादसह 8 प्रमुख शहरे समाविष्ट आहेत. या शहरांमध्ये घरांच्या किमती किती वाढल्या आहेत, त्याचे तपशील दिले आहेत.

Salary Hike in 2023 : खूशखबर! प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी…पुढच्या वर्षी वाढणार एवढा पगार

अहवालानुसार, या तिमाहीत दिल्ली-एनसीआरमधील निवासी मालमत्तेच्या किमती सर्वाधिक 10 टक्के वाढल्या आहेत. यानंतर अहमदाबाद आणि हैदराबाद येतात, जिथे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत किमती 9 टक्के आणि 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोलकात्यात 8 टक्के, बंगळुरूमध्ये 4 टक्के आणि मुंबई महानगर प्रदेशात 1 टक्क्यांनी किमती वाढल्या आहेत. पुण्यात मालमत्तांच्या किमती 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

दूध महागल्याने घरगुती बजेट बिघडणार? खर्चावर नियंत्रण ठेवत अशी करा बचत, या टिप्स येतील उपयोगी

एप्रिल ते जून घरांच्या किमती कोरोनापूर्व कालावधीच्या वर पोहोचल्या आहेत, जे घरांची मागणी प्रचंड असल्याचे दर्शवते. तसेच नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू झाले आहेत आणि न विकल्या गेलेल्या यादीतही घट झाली आहे. मात्र, महागड्या गृहकर्जामुळे घरांच्या मागणीवर किरकोळ परिणाम होईल, असे मानले जाते. परंतु सप्टेंबरनंतर सणासुदीच्या काळात घरांच्या विक्रीला वेग येऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/money/residential-property-prices-incresed-in-mumbai-pune-reports-mhpw-747524.html