मुंबई बातम्या

बॉम्बे आर्ट सोसायटीत ‘आर्ट कार्निव्हल’ – Sakal

बॉम्बे आर्ट सोसायटीत ‘आर्ट कार्निव्हल’

मुंबई
sakal_logo

By

मुंबई, ता. १६ : स्वातंत्र्यदिनानिमित्त बॉम्बे आर्ट सोसायटीत नुकतीच आर्ट कार्निव्हलला सुरुवात झाली. या कार्निव्हलचे उद्‍घाटन सुलेखनकार अच्युत पालव यांच्या हस्ते झाले. हे फेस्टिव्हल २१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. वांद्रे येथील बॉम्बे आर्ट सोसायटी कलासंकुलात सुरू झालेल्या पहिल्या आर्ट कार्निव्हलमध्ये ३२ कलाकारांच्या एकूण १०४ कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. कला दर्शक, कला लेखक आणि कला खरेदीदार आणि कलावंत यांच्यात परस्पर संवाद निर्माण करणे हा आर्ट कार्निव्हलचा उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08181 Txt Mumbai

Source: https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi22b08181-txt-mumbai-20220816020923