मुंबई बातम्या

Mumbai-Pune Train Update: मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दरड कोसळली; पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दु… – Lokmat

गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यभरात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी पुरस्थिती आहे. असे असताना अद्याप रेल्वे सेवेवर पावसाचा फारसा परिणाम झाला नव्हता. परंतू, मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. 

लोणावण्यातील मंकी हिलजवळ पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे मार्गावर ही दरड कोसळली आहे. यामुळे रेल्वे ट्रॅकचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. दरड हटविण्याचे काम सुरु आहे. यामुळे या मार्गावरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 

दोन मार्ग असल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळविण्यात आली आहे.  यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश आले आहे. 
 

Web Title: Mumbai-Pune Train Update: landslide on Mumbai-Pune railway track cracks; Traffic from Pune towards Mumbai was diverted to another route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/pune/mumbai-pune-train-update-landslide-on-mumbai-pune-railway-track-cracks-traffic-from-pune-towards-mumbai-was-diverted-to-another-route-a607/