मुंबई बातम्या

JEE Advanced साठी अर्ज करण्याची आणखी एक संधी; IIT Bombay नं वाढवली मुदत – ABP Majha

JEE Advanced 2022 : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (IIT Bombay) आजपासून जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) अॅडव्हान्स 2022 साठी नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांना आणखी एक संधी आहे. II Bombay नं अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ पुढे ढकलली आहे. उमेदवार आता 12 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइट jeeadv.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. JEE Advanced 2022 ची परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. JEE Advanced साठी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 होती. आता ती 12 ऑगस्ट रात्री 8 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 

अधिकृत वेबसाइटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, उमेदवार JEE Advanced साठी 12 ऑगस्ट 2022 पर्यंत रात्री 8 पर्यंत अर्ज करू शकतील, ही अंतिम मुदत आहे. विद्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रं आणि परीक्षेसाठी शहर केंद्राची निवड आज फायनल करावी लागेल. विद्यार्थी आज रात्री 8 वाजेपर्यंत https://jeeadv.nic.in या वेबसाईटवर भेट देऊन पैसे भरू शकतात. या परीक्षेचं प्रवेशपत्र 23 ऑगस्ट रोजी जारी केलं जाईल. उमेदवार 28 ऑगस्ट 2022 पर्यंत डाउनलोड करू शकतात. 28 ऑगस्ट रोजी दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. पेपर 1 हा सकाळी 9 ते 12 या वेळेत आणि पेपर 2 दुपारच्या शिफ्टमध्ये दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत घेण्यात येईल.

JEE Advanced साठी नोंदणी कशी करावी? 

  • तुम्ही jeeadv.ac.in या JEE Advanced च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकता.
  • रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा आणि अर्ज भरा.
  • तुमचं यूजरनेम आणि पासवर्ड जनरेट होईल, तो सेव्ह करा. 
  • नंतर यूजरनेम आणि पासवर्डसह लॉगिन करा आणि JEE Advanced फॉर्म भरण्यास सुरुवात करा. 
  • फोटो, स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
  • त्यानंतर फी भरा आणि भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढा.

कधी असेल परीक्षा? 

JEE Mains ची परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे JEE Advanced Admit Card परीक्षेच्या एक आठवडा आधी जाहीर होणं अपेक्षित आहे. IIT JEE म्हणजेच, Advanced Exam 2022 IIT Bombay द्वारे रविवारी घेतली जाईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पेपर 1 ची परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल. पेपर 2 ची परीक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होईल.

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी कोण पात्र असेल

जेईई मेन 2022 अंतिम गुणवत्ता यादीमध्ये टॉप 2,50,000 रँकमध्ये समाविष्ट असलेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षा 2022 साठी पात्र असतील. जर दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांची रँक आणि गुण समान असतील तर 2.50 लाखांचा हा आकडा थोडा जास्त असू शकतो. जेईई मेनचे निकाल जाहीर झाले आहेत.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Source: https://marathi.abplive.com/news/india/jee-advanced-2022-registrations-last-date-extended-on-jeeadv-ac-in-apply-soon-1089143