मुंबई बातम्या

जेईई परीक्षेचा स्कोअर कमी आला तरी टेन्शन नॉट ; आयआयटीतील ‘या’ कोर्सलाही घेता येईल प्रवेश – TV9 Marathi

ज्यात 12 वी नंतर थेट प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (JEE )स्कोअर आवश्यक नाही. हे अभ्यासक्रम पदवी स्तरावर दिले जातात. यामध्ये आयआयटी मद्रास आणि आयआयटी बॉम्बे सारख्या संस्थांचा समावेश आहे.

देशातील आघाडीच्या शिक्षण संस्था आयआयटीमध्ये (IIT)प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी जेईई परीक्षेत भाग घेतात. त्यानंतरही केवळ 5 ते 10 टक्के विद्यार्थ्यांनाच आयआयटीमध्ये प्रवेश मिळतो.अशा परिस्थितीत आता विद्यार्थी (Students )जेईईशिवाय आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ शकतील. असे काही कोर्सेस आहेत ज्यात 12 वी नंतर थेट प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (JEE )स्कोअर आवश्यक नाही. हे अभ्यासक्रम पदवी स्तरावर दिले जातात. यामध्ये आयआयटी मद्रास आणि आयआयटी बॉम्बे सारख्या संस्थांचा समावेश आहे.

IIT मद्रास मध्ये बीएससी कोर्स

हा अभ्यासक्रम IIT मद्रासने 01 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर केला होता. संस्थेच्या या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रसिद्ध कंपन्या किंवा संशोधन संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना onlinedegree.iitm.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती घेता येईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रास 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिक कामगारांसाठी डेटा सायन्समध्ये बीएससी करता येते. ज्या विद्यार्थ्यांनी मे 2022 पर्यंत इयत्ता 11 वी पूर्ण केली आहे किंवा ते सध्या 12 वी मध्ये आहेत ते पात्रता प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. जर त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली तर ते 12वी पूर्ण केल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

आयआयटी ऑलिम्पियाड कोर्स

जे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी पात्र ठरतात ते जेईई अॅडव्हान्स्ड क्रॅक न करता थेट आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयआयटी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे प्रवेश देते. दरम्यान, 2018 मध्ये, IIT-Bombay ने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडसाठी बीएससी कोर्स सुरु केला आहे.  या अभ्यासक्रमाद्वारे बीएस्सी गणित विषयात प्रवेश घेता येतो. यामध्ये प्रवेशासाठी उमेदवारांना मॅथ असोसिएशन IIT Bombay- math.iitb.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या.

[embedded content]

हे सुद्धा वाचा

Source: https://www.tv9marathi.com/education/even-if-jee-exam-score-is-low-dont-stress-one-can-also-take-admission-in-ya-course-in-iit-au129-780298.html