मुंबई बातम्या

मुंबई गारेगार! अधूनमधून येणाऱ्या मोठ्या सरींमुळे घराबाहेर पडलेल्यांची धावपळ – Lokmat

मुंबई : उकाडा, उन्हाचा तडाखा, घामाच्या धारांपासून रविवारी मुंबईकरांना मुक्ती मिळाली आणि वाऱ्याबाबत दाखल झालेल्या धारांनी मुंबईकरांना गारेगार केले. रविवारी दुपारपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू झालेला पाऊस सायंकाळपर्यंत कोसळत होता. अधूनमधून येणाऱ्या मोठ्या सरींमुळे घराबाहेर पडलेल्यांची धावपळ झाल्याचे चित्र होते. अनेकांची त्यामुळे तारांबळ उडाली.

रविवारची सकाळ सूर्याच्या कोवळ्या किरणांनी सुरू झाली. समुद्रात उठणाऱ्या अथांग लाटांवर सोनेरी किरणे आच्छादली होती. मात्र दुपार होईस्तोवर वाऱ्याच्या वेगाने दाखल झालेल्या ढगांनी मुंबईला कवेत घेतले. दुपारी दोन वाजेपर्यंत मुंबई कोरडीठाक होती. मात्र अडीच नंतर पाऊस सुरू झाला. दुपारी चारनंतर पाऊस थोडा कमी झाला. परंतु रात्री पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

तलावांची काय स्थिती?

मोडक सागर, तानसा आणि तुळशी तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. मध्य वैतरणा आणि भातसा धरणांचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुंबईत आतापर्यंतच्या एकूण पावसाची सरासरी २ हजार ४७२ मिलीमीटर झाली असून, हा पाऊस ५७.०६ एवढा टक्के आहे.

आतापर्यंतचा पाऊस
कुलाबा १,३५५ मिमी
सांताक्रूझ १,६४५ मिमी

वार्षिक सरासरी
कुलाबा २,२४० मिमी
सांताक्रूझ २,७०५ मिमी

पावसाची टक्केवारी
कुलाबा ५९.०४ 
सांताक्रूझ ६०.८४ 

७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.
२ ठिकाणी झाडे पडली.
१ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला.

Web Title: The evacuees run out of their homes due to occasional heavy showers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/mumbai/the-evacuees-run-out-of-their-homes-due-to-occasional-heavy-showers-a642/