मुंबई बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : नगरकरांनो इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात 9 ऑगस्टपर्यंत.. – Ahmednagarlive24

ahmednagar-breaking-citizens-pay-attention-here-in-the-district

Ahmednagar – ‘मोहरम’ (Muharram) या सणानिमित्त अहमदनगर जिल्हा पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.  या सणानिमित्त शहरातून ८ व ९ ऑगस्ट रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहेत.

या मिरवणुकीत अहमदनगर शहरात सार्वजनिक शांतता अबाधीत राखणे व गंभीर स्वरुपाची अशांतता निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३९ नूसार पोलिसांनी यासाठी शहरातील ६४ इमारतींवर प्रतिबंधात्मक आदेश लावत या इमारतींचे छते ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते ९ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत ताब्यात घेणार आहेत. याबाबत अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Superintendent of Police Manoj Patil) यांनी माहिती दिली आहे.

या आदेशानुसार  ८ ऑगस्ट २०२२ रोजी ‘कत्तल’ची रात्र मिरवणूकीचे वेळी १) कोंडयामामा चौक हॉटेल राजेंद्र चौक, २) श्रीराम मंदिर दाळमंडई, ३) लालूशेट मद्यान यांची इमारत, ४) विनोद वत्सदाणी सरस्वती साडी मंगलगेट ५) सुरतवाला बिल्डिंग तेलीखुंट ६) व्यापारी असोसिएशन बिल्डिंग तेलीखुंट ७) कापड बाजार बाबुशेट बोरा यांची इमारत ८) शहाजी चौक नितु ड्रेसेस शांतीलाल चोपडा यांची इमारत

९) कापड बाजार मोची गल्ली कॉर्नर देडगावकर यांची इमारत १०) नवा मराठा प्रेस इमारत ११) साफल्य इमारत काटे गल्ली कॉर्नर डॉ कुलकर्णी यांचे समोरील इमारत १२) बार्शीकर बिल्डिंग अर्बन बँक चौक १३) हॉटेल अन्नपुर्णा आझाद चौक १४) दैनिक समाचार कार्यालय १५) डॉ. देशपांडे हॉस्पीटल १६) बोरुडे यांची बिल्डिंग पटवर्धन चौक मेडिकलच्यावर १७) श्रीराम फ्लोरिस्ट दातरंगे यांचे दुकान सांगळे गल्ली कॉर्नर १८) जामा मस्जिद कोटांच्या मागे १९) सिनिअर डिव्हीजन कोटांजवळ २०) सेशन कोर्ट इमारत २१) नवले बिल्डिंग कोर्टाचे मागील बाजुस २२) अॅडव्होकेट चेंबर टॉवर्स

२३) कृष्णकुंज अपार्टमेंट दो बोटी चिरा मस्जिद २४) आदर्श चेंबर्स सबजेल चौक २५) यतिमखाना मनपा चौक २६) देवकाते बिल्डिंग पंचपीर चावडी २७) हिरा एजन्सी जुना बाजार २८) नमोह प्रिन्टस बॉम्बे बेकरी २९) उमेश गिल्डा इमारत जुना बाजार

३०) आनंद चेंगडिया यांची बिल्डिंग बुरुडगल्ली ३१) चांदुरकर बिल्डिंग, धरती चौक ३२) बहार जनरेटर्स इमारत हातमपुरा मस्जिद समोर हातमपुरा चौक (३३) अनिल लुकंड बिल्डिंग रिक्षा स्टॉप नालबंद बिल्डिंग ३४) काका हलवाई बिल्डिंग रामचंद्र खुट ३५ ) डॉ धुत हॉस्पीटल किंग्ज रोड अहमदनगर ३६) शकुर शेख पत्रकार यांची इमारत ब्राम्हण कारंजा जवळ ३७) तांगे गल्ली मनोरा या इमारती तात्पुरत्या कालावधीकरीता ताब्यात घेण्यात येणार‌ आहेत.

तसेच ०९ ऑगस्ट २०२२ रोजी ‘मोहरम’ विसर्जन मिरवणूकीचे वेळी १) बँक ऑफ महाराष्ट्र चौपाटी कारंजा, २) मंगलमुर्ती इमारत चौपाटी कारंजा ३) दर्पण बिल्डिंग दिल्लीगेट, ४) चंद्रलोक अपार्टमेंट दिल्लीगेट ५) श्रीपाद छिंदम बिल्डिंग हॉटेल पंजाबी तडका,

(६) हॉटेल दिल्ली दरबार मनोर पॉईंट ७) व्यापारी असोसिएशन बिल्डिंग आडते बाजार ८) एम एल लड्डा इमारती पिंजार गल्ली ९) छल्लाणी एंटर प्राईजेस पारशाखुंट १०) आर्शिवाद डायनिंग हॉल ख्रिस्त गल्ली ११) संगम चौक ख्रिस्तगल्ली कॉर्नर समीर बोथरा बिल्डिंग १२) उमेश गिल्डा | इमारत जुना इमारत १३) नमोह प्रिन्टस बॉम्बे बेकरी १४) हिरा एजन्सी जुना कापड बाजार

१५) देवकाते इमारत पंचपीर चावडी १६) यतिमखाना मनपा चौक १७) आदर्श चं ‘बर्स सबजेल चौक १८) कृष्णकुंज अपार्टमेंट दो बोटी चिरा मस्जिद जवळ १९) अॅडव्होकेट चेंबर टॉवर्स २०) नवले बिल्डिंग कोर्टाचे मागील बाजुस २९) सेशन कोर्ट इमारत २२) सिनिअर डिव्हीजन इमारत कोर्टाजवळ २३) जामा मस्जिद कोर्टाच्या मागे २४ ) श्रीराम फ्लोरिस्ट दातरंगे यांचे दुकान सांगळे गल्ली कॉर्नर

२५) आर्शिवाद चिवडा फरसा खाँ मस्जिद समोर २६) डॉ सुंदर गोरे यांची बिल्डिंग चौपाटी कारंजा २७) चौपाटी कारंजा मनोरा, यासर्व इमारतीची छते (गच्ची )वरील तात्पुरत्या कालावधीकरीता ताब्यात घेण्यात येणार आहेत.असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Source: https://ahmednagarlive24.com/ahmednagar-breaking-citizens-pay-attention-here-in-the-district/