मुंबई बातम्या

क्रीडा विश्वातील अविस्मरणीय किस्से: आमच्या ठाेस उत्तराने ब्रिटिश पत्रकाराची बाेलतीच झाली बंद – दिव्य मराठी

औरंगाबादएका दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

मोहन बागान आणि भारताचे कर्णधार डाॅ. तालीमेरेने एओ यांनी १०४८ च्या लंडन आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाकडून ध्वजवाहकाची भूमिका बजावली हाेती. स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला हाेता. यादरम्यान भारतीय संघाचा या स्पर्धेतील सहभाग हा लक्षवेधी ठरत हाेता. मात्र, दुसरीकडे संघातील अर्ध्यापेक्षा अधिक खेळाडू हे अनवाणी पायांनीच सहभागी झाले हाेते. त्यांच्या पायात दर्जेदार बूटही नव्हते. त्यामुळे फुटबाॅल संघातील अनेक जण बूट न घालताच मैदानावर उतरले हाेते. या वेळी मैदानावरील हा सहभाग सर्वांनाच खटकत हाेता. मात्र, भारतीय संघाचे खेळाडू सर्वाेत्तम कामगिरी करण्यावर आपले लक्ष केंद्रित करून खेळत हाेते. या सामन्यानंतर एका ब्रिटिश पत्रकाराने भारतीय खेळाडूला बूट न घालताच अनवाणी पायाने मैदानावर का खेळत आहेत, असा प्रश्न केला. हा प्रश्न भारतीय खेळाडूंच्या भावनांना दुखावणारा हाेता. यादरम्यानच्या उत्तराने पत्रकाराची बाेलतीच बंद झाली. ‘हा फुटबाॅल आहे, बूटबाॅल नाही,’ या ठाेस उत्तराने सर्वांनाच माेठा धक्का बसला. याच उत्तराने स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंवर काैतुकाचा वर्षाव करण्यात आला.

अविस्मरणीय : बॉम्बे जिमखान्यात पहिली कसाेटी
बॉम्बे जिमखान्यावर भारतीय संघाने पहिली कसाेटी खेळली हाेती. यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात डिसेंबर १९९३ मध्ये हा कसाेटी सामना झाला. यात इंग्लंड संघ ९ गड्यांनी विजयी ठरला हाेता.

७५ वर्षांतील अविस्मरणीय माेहिमा (१९९३-२०००)
-भारतने १९९३ मध्ये हीराे कपच्या फायनलमध्ये विंडीजचा पराभव करून किताब पटकावला. प्रथमच याचे सॅटेलाइटवर प्रक्षेपण झाले.
-बाॅक्सर डिंगो सिंगने १९९८ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले हाेते. भारताने १९८२ नंतर पहिल्यांदा आशियात बाॅक्सिंगचेे पदक जिंकले.
-टेनिसपटू लियांडर पेसने १९९६ अटलांटा आॅलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले. हे भारताचे ४४ वर्षांतील पहिले वैयक्तिक पदक ठरले.
– अनिल कुंबळेने १९९९ मध्ये पाकविरुद्ध कसाेटीच्या डावात १० बळी घेतले. हे करणारा ताे पहिला भारतीय गाेलंदाज ठरला.
-वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीने २००० सिडनी आॅलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले. यासह ती आॅलिम्पिक पदक विजेती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

बातम्या आणखी आहेत…

Source: https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/with-our-firm-answer-the-british-journalists-life-was-closed-130153494.html