मुंबई बातम्या

बॉम्बे आर्ट सोसायटीचे पावसाळी कला प्रदर्शन सुरू – Sakal

बॉम्बे आर्ट सोसायटीचे पावसाळी कला प्रदर्शन सुरू

मुंबई
sakal_logo

By

मुंबई, ता. ३ ः बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या यंदाच्या पहिल्या पावसाळी कला प्रदर्शनाला वांद्रे येथे सुरुवात झाली आहे. हे प्रदर्शन १० ऑगस्टपर्यंत चालणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
यंदाच्या या प्रदर्शनात एकूण ६३ चित्र आणि शिल्पकारांच्या १२० कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत; तर प्रामुख्याने प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, विजय आचरेकर, रावसाहेब गुरव, डी. एस. राणे, शुभ गोखले, सुजाता आचरेकर, अनंत ननकम, पांडुरंग ताठे, जयश्री पाटणकर, शिल्पा निकम, उत्तम पाचारणे, रतन सहा, दीपक पौनीकर, एम. पी. पवार आदी शिल्पकार आणि चित्रकार यांचे चित्र आणि शिल्प कलाकृती ठेवण्यात आल्या असून त्या प्रेक्षकांना जवळून पाहता येतील, अशी माहिती बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली. पाटील यानी सांगितले की, ही सोसायटी भारतात दृश्यकलेसाठी कुठलेही कलादालन नव्हते तेव्हापासून कला प्रदर्शने भरवून दृश्यकलेचा प्रचार व प्रसाराचे काम करत आहे. त्यात या वर्षापासून दर वर्षी भरवल्या जाणाऱ्या पावसाळी प्रदर्शनाची भर पडली असून तरुण चित्र-शिल्पकारांना व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07915 Txt Mumbai Today

Source: https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi22b07915-txt-mumbai-today-20220803104553