मुंबई बातम्या

Viral Video : मुंबई महापालिकेचे कर्मचारी कसं काम करतायेत बघून अंगावर काटा येईल – Loksatta

मुंबई मनपाचे कर्मचारी नेहमीच जीवाची परवा न करता आपली जबाबदारी पार पाडत असतात. मनपा कर्मचाऱ्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओत मनपाचे कर्मचारी जीवाची परवा न करता पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करणात दिसून येत आहे.

मुंबईत सद्या पावसाचा जोर सुरू आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. दरम्यान, आज जय हिंद सिनेमाजवळील डॉ. बी. ए. रोड येथे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाला होता. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता, ही पाण्याची पाईप लाईन दुरुस्त केली.

मनपा कर्मचाऱ्यांनी दाखलवेल्या या कर्तव्यनिष्ठेबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. तर अनेकांकडून मुंबई मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेकडे गळतीचे निराकरण करण्यासाठी योग्य तंत्रज्ञान नाही हे अत्यंत खेदजनक आहे, अशी टीका अनेकांनी केली आहे. तसेच त्यांना आवश्यक सुरक्षा साधने पुरवठा व त्याबाबतचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/viral-video-of-how-employees-of-mumbai-municipal-corporation-work-without-taking-precaution-spb-94-3027741/