मुंबई बातम्या

दिव्य मराठी विशेष: मुंबई फुटबाॅल क्लबची डेव्हलपमेंट ऑफिसर तनाज आता कम्युनिटी काेचच्या भूमिकेमध्ये – दिव्य मराठी

  • Marathi News
  • Sports
  • Development Officer Of Mumbai Football Club Tanaj Now In The Role Of Community Coach

अली असगर देवजानी | अहमदाबाद8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

तनाज माेहंमद ही मुंबई सिटी फुटबाॅल क्लबमध्ये ग्रासरूट डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करत आहे. यातील तिची कामगिरी सातत्याने लक्षवेधी ठरली. त्यामुळेच नुकतीच मँचेस्टर येथे तिची कम्युनिटी काेचच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. वेगवेगळ्या फुटबाॅल क्लबच्या सहा जणांचा यामध्ये समावेश आहे. त्यापैकी तनाज ही एकमेव मुंबई सिटीची आहे. तिने मुंबई सिटीचे प्रतिनिधित्व केले.

वयाच्या नवव्या वर्षापासून तिने हाॅकीमध्ये ओळख मिळवली हाेती. याशिवाय तिने याआधी ट्रॅक अँड फील्डमध्येही आपले नशीब आजमावले हाेते. तिने हाॅकीमध्येही उल्लेखनीय खेळीतून भारतीय ज्युनियर संघातील प्रवेशही निश्चित केला हाेता. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर तिने फुटबाॅलच्या स्पधॅेत सहभाग नाेंदवला. यादरम्यान तिने खेळता खेळता क्रीडा व्यवस्थापनचा काेर्सही पूर्ण केला. यातूनच तिला ग्रासरूट डेव्हलपमेंट ऑफिसर हाेण्याची संधी मिळाली. तिने ही भूमिका मुंबई सिटीसाठी बजावली. तिने यापूर्वी मुंबई संघाची सहायक प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

युवांवर खास फाेकस; माेफत प्रशिक्षण
तनाजने आता युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी ती १२ वर्षांखालील आणि अनाथ, गरीब लहान मुलांनाही माेफत प्रशिक्षण देते. तिने या मुलांमध्ये फुटबाॅलची गाेडी लावली आहे. त्यामुळे त्यांनाही आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची संधी मिळाली. याच युवांना तिच्या मार्गदर्शनाखाली १५, १८ वर्षांखालील स्पर्धांच्या गटातही सहभागी हाेता आले. याशिवाय त्यांची प्रशिक्षण कॅम्पसाठीही निवड झाली.

खेळाडूंचे फुटबाॅलमध्ये उज्ज्वल करिअर
फुटबाॅल खेळणाऱ्यांना आगामी काळात करिअर उज्ज्वल करण्याची माेठी संधी आहे. यामध्ये अनेक संधी आहेत. हे ओळखून यात करिअर करा. जागतिक स्तरावर फुटबाॅल खेळला जाताे. त्यामुळे गुणवंतांना जगाच्या कानाकाेपऱ्यातही संधी मिळू शकते. त्यासाठी मेहनत करण्याची इच्छाशक्ती हवी, असेही तिने सांगितले.

बातम्या आणखी आहेत…

Source: https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/development-officer-of-mumbai-football-club-tanaj-now-in-the-role-of-community-coach-130070242.html