मुंबई शहर आणि उपनगरांत मंगळवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा मुक्काम बुधवारीही कायम आहे. बुधवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे सखलभागात जलमय झाले. मुंबई शहर आणि उपनगरांत बुधवारी दिवसभर मध्यम आणि मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून प्रतितास ४५-५५ किमी वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता कुलाबा केंद्रातून वर्तविण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतील वेगवेगळ्या भागांत सुमारे सकाळी सात वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत गेल्या तीन तासांत २० मिमी ते ५५ मिमीपर्यंत पाऊस पडला. वडाळा येथे ४३.४४ मिमी, दादर येथे ४२.१७, माटुंगा येथे ४०.६४ मिमी, कुलाबा येथे ३९.६२ मिमी, वरळी येथे ३६.८२ मिमी, चेंबूर येथे ३३.२८ मिमी, कुर्ला येथे २८.१८ मिमी पावसाची नोंद झाली.
बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (गेल्या २४ तासांत) पडलेल्या पावसाच्या नोंदी –
मुंबई – सांताक्रूझ ४४.६ मि.मी., कुलाबा २४ मि.मी.
ठाणे जिल्हा – उल्हासनगर ५८ मि.मी., शहापूर ७८ मि.मी., मुरबाड ५६ मि.मी., अंबरनाथ ६० मि.मी., कल्याण ७४ मि.मी., भिवंडी ५५ मि.मी.
पालघर जिल्हा – तलासरी १७.३ मि.मी., वाडा १४८ मि.मी., विक्रमगड ११९ मि.मी., पालघर १२३ मि.मी., वसई २२ मि.मी., जव्हार ८४ मि.मी.
रायगड जिल्हा – पेण ९६ मि.मी., म्हसळा २७ मि.मी., माणगाव ४५ मि.मी., उरण ५१ मि.मी., श्रीवर्धन ८ मि.मी., खालापूर १२४ मि.मी., रोहा ६६ मि.मी., पोलादपूर ७१ मि.मी., मुरुड ५ मि.मी., सुधागड ११० मि.मी., तळा ४४ मि.मी., पनवेल ८६.२ मि.मी., माथेरान २१७ मि.मी., अलिबाग ८ मि.मी., महाड ७२ मि.मी., कर्जत १३८ मि.मी.
सिंधुदुर्ग जिल्हा – दुधमार्ग २२ मि.मी. मुळदे ३०.४ मि.मी., सावंतवाडी २५ मि.मी., देवगड ६ मि.मी., वैभववाडी ४८ मि.मी., कणकवली ३४ मि.मी., कुडाळ ३४ मि.मी., मालवण १० मि.मी.
रत्नागिरी जिल्हा – खेड ८१ मि.मी., लांजा १२० मि.मी., चिपळूण ९७ मि.मी., देवरुख ४५ मि.मी., राजापूर ६२ मि.मी., मंडणगड ७० मि.मी., दापोली ३० मि.मी., गुहागर १४ मि.मी., वाकवली ३१ मि.मी.
Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-chance-of-heavy-rains-with-gusty-winds-many-places-are-waterlogged-in-the-lowlands-mumbai-print-news-msr-87-3018625/