मुंबई बातम्या

Mumbai : पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत टाक्या, सखल भागातील रहिवाशांचं टेन्शन मिटलं, मुंबई… – TV9 Marathi

भूमिगत टाक्यांची योजना

Image Credit source: tv9

पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. या मोठ्या भूमिगत टाक्या कमीत-कमी तीन तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवू शकतील. मुसळधार पाऊस आणि समुद्रात मोठी भरती असल्यास याचा विशेष उपयोग होऊ शकतो.

मुंबई : मुंबईसह (Mumbai) उपनगरात मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडत असल्यानं परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचतंय. पुढील चार दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालंय. दहीसर, कांदिवली, मालाड, गोरेगांव आणि अंधेरी (Andheri) येथील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्याचा फटका परिसरातील अनेक नागरिकांना बसला आहे. नवी मुंबई भागात पाणी साचायला सुरुवात झालीये. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, आता हिंदमाता पाणी साचण्यापासून सुटका होण्यासाठी साठवण टाक्यांचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे यंदा तरी पाणी साचण्यापासून सुटका होऊ शकते, असं बोललं जातंय.

[embedded content]

भूमिगत टाक्यांचा प्रकल्प

यंदा तरी पाणी साचण्यापासून हिंदमाता परिसरातील नागरिकांची सुटका होऊ शकते. भूमिगत टाक्यांचा प्रकल्प पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गतवर्षी महापालिकेनं हाती घेतला होता. त्यानुसार प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राउंड इथं भूमिगत टाक्या तयार केल्या आहेत.  हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात.

सखल भागाचा प्रश्न सुटणार?

पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. या मोठ्या भूमिगत टाक्या कमीत-कमी तीन तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवू शकतील. मुसळधार पाऊस आणि समुद्रात मोठी भरती असल्यास याचा विशेष उपयोग होऊन या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा महापालिकेला विश्वास वाटत आहे.

टाक्यांचा उपयोग काय?

  1. या मोठ्या भूमिगत टाक्या पावसाळ्यामध्ये कमीतकमी 3 तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतील.
  2. जोरदार पर्जन्यवृष्टी तसेच संकटाच्या काळात याचा विशेष उपयोग
  3. सखल भागात तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल
  4. मुंबईच्या ज्या ज्या भागामध्ये मुसळधार पावसात पाणी तुंबते अशा ठिकाणी यासारखे प्रकल्प उभे करण्याची गरज
  5. कशा आहेत टाक्या, असंही प्रश्न असतो. तर या भूमीगत टाक्यांच्या वरच्या बाजूस अर्बन लँडस्केपींग करुन त्या आच्छादित केल्या जातील.
  6. मुंबईतील ज्या भागात विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पावसात पाणी साचते किंवा पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप वापरणे कठीण होते. अशा ठिकाणी मुंबई महापालिकेने अशा आणखीन संभाव्य जागांसाठी शोध सुरू केला आहे.
  7. हिंदमाता भूमिगत पाणीसाठा 2500 क्यूबीक मीटर
  8. सेंट झेवियर्स मैदान भूमीित पाणीसाठा 40,000 क्यूबीक मीटर
  9. प्रमोद महाजन उद्यान भूमिगत 60,000 क्यूबीक मीटर पाणीसाठा
  10. असे एकूण 1 लाख 2500 क्यूबीक मीटर पाणीसाठा हिंदमाता परीसरातील जमिनीखाली साठवला जाणार आहे.

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/underground-tanks-for-drainage-tension-in-low-lying-areas-eased-mumbai-municipal-corporation-project-au167-752144.html