मुंबई बातम्या

दमदार पावसाअभावी जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी झाला; मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय – Saam TV (साम टीव्ही)

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयामध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त १ लाख ४१ हजार ३८७ दशलक्ष लिटर म्हणजे ९.७७ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्याच दिवशी हा जलसाठा १५.५४ टक्के इतका होता.

Source: https://www.saamtv.com/mumbai-pune/mumbai-latest-news-10-percentage-water-cut-in-mumbai-from-monday-27th-june-2022-vvg94