मुंबई बातम्या

MHADA Lottery 2022 : मुंबई, पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीत होणार मोठं स्वप्न पूर्ण – News18 लोकमत

मुंबई, 3 जून : मुंबई, पुण्यात (Mumbai, Pune) आपले घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते परंतु हे अनेकांना शक्य होत नाही. यासाठी राज्य शासन म्हाडाअंतर्गत (MHADA Home Plan) सामान्यांना घरे देण्याची योजना राबवत असते. त्यामुळे आतासुद्धा स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी मुंबईमध्ये दिवाळीत म्हाडा लॉटरी (MHADA Lottery 2022 Mumbai) निघणार आहे.
पुणे विभागाची सोडत
मुंबईमध्ये दिवाळीत तीन हजार घरांची लॉटरी निघणार आहे. तसे म्हाडाच्या पुणे विभागासाठीही तब्बल साडेचार हजारांपेक्षा जास्त घरांची सोडत निघणार आहे. (MHADA Lottery 2022 Pune) यामध्ये पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हाडाचे पुणे विभागाचे अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले की, पुणे विभागासाठी तब्बल 4 हजार 744 घरांची सोडत निघणार आहे. यासंदर्भातील जाहिरातही काही दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर यासाठी अर्ज करता येणार आहे.
म्हाडाची घरे आवडीची
 गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या पुणे विभागाकडून अनेक सोडती जाहीर करण्यात आल्या. आता काढली जाणारी ही दहावी सोडत असणार आहे. तर मागील दोन वर्षातील पुणे विभागातील ही चौथी सोडत असणार आहे. म्हाडाच्या घरांची किंमत ही आवाक्यात असल्याने अनेकांची म्हाडाच्या घरांना पसंती असते. इतकेच नव्हे तर म्हाडाची घरे ही विश्वासार्ह मानली जातात. म्हणून अनेक जण म्हाडामधील सोडतीमधील घर खरेदी करतात. त्यामुळे नागरिकांना यासाठी जाहिरात कधी निघणार, याची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा – MHADA : म्हाडाच्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत बदल; आता तुम्ही कुठल्या उत्पन्न गटात मोडणार पाहा…
म्हाडा टाऊनशीप उभारणार
म्हाडा अंबरनाथमध्ये टाऊनशीप (Township in Ambarnath) उभारणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. ही राज्यातील सगळ्यात मोठी टाऊनशीप असणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून तब्बल 200 एकर जागेचे सर्व्हेक्षणही करण्यात आले आहे. मुंबई उपनगरातील वाढती लोकसंख्या पाहता, डोंबिवली आणि कल्याणच्या पुढे अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पर्यायी टाऊनशिप उभारण्याचा विचार केला जात  आहे.

तुमच्या शहरातून (पुणे)

पुणे

  • BREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच! राज ठाकरेंची सभा रद्द

  • हा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल

    हा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल

  • Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO

    Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO

  • Shocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर

    Shocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर

  • Love Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर

    Love Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर

  • Engineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत

    Engineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत

  • जगू द्याल का नाही? राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले

    जगू द्याल का नाही? राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले

  • पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार!

    पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून…,पुण्यातील किळसवाणा प्रकार!

  • पुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन

    पुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन

  • भाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय?

    भाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय?

  • राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा

    राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा

पुणे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/mumbai/mhada-lottery-for-the-year-2022-in-mumbai-and-pune-registrations-starts-soon-mhkd-711802.html