मुंबई बातम्या

धुळ्याहून मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल; स्वतंत्र रेल्वेची मागणी – Maharashtra Times

धुळ्याहून मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आधी धुळे-चाळीसगाव पॅसेंजरला मुंबई, पुण्यासाठी स्वतंत्र बोगी लावण्यात येत होत्या, मात्र मेमू ट्रेन सुरू झाल्यापासून या बोगी लावता येत नसल्याने धुळ्याहून मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. धुळे चाळीसगाव हा मध्य रेल्वे मार्गावर महत्त्वाचा मार्ग आहे या मार्गावर सन 1900 मध्ये धुळे चाळीसगाव पॅसेंजर सुरू करण्यात आली होती, मात्र येथून मुंबई आणि पुण्याला जाण्यासाठी रेल्वेची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने संध्याकाळी सात वाजता सुटणाऱ्या चाळीसगाव पॅसेंजरला मुंबई बोगी लावण्यात येत होती, या बोगीला प्रवाशांचा प्रतिसाद देखील उत्तम मिळत होता. यानंतर 2014 पासून धुळे चाळीसगाव पॅसेंजरला धुळे पुणे बोगी लावण्यात येऊ लागली.मात्र धुळे चाळीसगाव रेल्वे मार्गावर 13 डिसेंबर 2019 पासून सुरू करण्यात आलेल्या मेमु ट्रेनला पूर्वीची रेल्वे बोगी जोडण्याची सुविधा नसल्याने मुंबई पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. वारंवार मागणी करूनही रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याचं प्रवासी सांगतात. मुंबई पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/dhule/demand-for-independent-railways/videoshow/91659836.cms