मुंबई बातम्या

Maharashtra News Live Updates : मुंबई आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी – Maharashtra Times

नगर महापालिका, नगरपालिकांनंतर आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचीही प्रक्रिया सुरू, मुदत संपलेल्या २५ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणार्‍या २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करा, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, २३ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना प्रारूप सादर करण्यास सांगण्यात आले, २ जूनला त्याची अधिसूचना जारी केली जाईल, ८ जूनपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात येणार, २२ जूनला सुनावणी होऊन २७ जूनला अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार
धुळे शहरात घरात घुसून चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्या चोरट्याला 24 तासांत जेरबंद करून घरफोडी उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश
बारामती तालुक्यातील पणदरे येथे बारामती नीरा महामार्गावर पार्किंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, ही इलेक्ट्रिक दुचाकी संपूर्ण जळून खाक, अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांना आग लागण्याच्या प्रमाणात वाढ
सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाची हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, तब्बल २५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
भ्रष्टाचाराविरोधात तुम्ही कुठला लढा लढत आहात. या घोटाळ्यात तुमचा संबंध आहे असं म्हटल्यावर तुमचं काय उत्तर आहे. युवक प्रतिष्ठान हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक उद्योग आहे. मुंबईतले बिल्डर्स, उद्योगपती, व्यापारी ज्याच्यावर ईडी आणि सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत. अशा लोकांना ब्लॅकमेल करून किरीट सोमय्या लाखो कोट्यावधी रूपये गोळा करतात. युवक प्रतिष्ठानच्या नावे चेक घेतात, कॅशचा व्यवहारही होत असावा, असं त्यांचेच लोक सांगतात. यासर्वांची चौकशी आता होणार आहे.
कल्याण तालुक्यातील मानिवली गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे, उल्हास नदी काठी असलेलं हे गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याने “नदी उशाला कोरड घशाला”अशी परिस्थिती या गावाची झाली आहे
उल्हासनगरच्या मोबाईल चोराचे महागडे शौक, २२ ब्रँडेड टीशर्ट आणि पँट्स चोरल्या, चोरीचा दुसरा गुन्हा झाला दाखल
कासारवाडा भागातील प्रितीन प्रकाश खर्जुले या लहान भावाची ६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या, त्यापाठोपाठ १० मे रोजी त्याच्या मोठ्या भावाचा मृतदेह हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर आढळल्याने खळबळ
कर्जत तालुक्यात पाणीटंचाईचे चटके, शासनाची ट्रँकरला मंजुरी नाही, जीवनज्योत सामाजिक संघटनेचा पाणी टंचाई निवारण्याचा प्रयत्न

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-political-breaking-news-mumbai-news-national-politics-live-updates-11-may-2022-today/liveblog/91480633.cms