मुंबई बातम्या

IIT Bombay ला मिळाले दोन फ्लॅट, माजी प्रोफेसरच्या कुटुंबियांनी घेतला कौतुकास्पद निर्णय – News18 लोकमत

मुंबई, 07 मे: इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) हे भारतातील सर्वांत प्रतिष्ठित आणि सर्वांत कॉम्पिटिटिव्ह इन्स्टिट्युट आहे. सायन्स (Science) आणि इंजिनीअरिंग (Engineering) ब्रँचमधील टॉपर विद्यार्थ्यांची पहिली पसंती याच संस्थेला मिळते. मुंबईतील (Mumbai) पवई (Powai) परिसरामध्ये असलेलं आयआयटी बॉम्बे ही एक ऑटोनॉमस (Autonomous) पब्लिक टेक्निकल आणि रिसर्च युनिव्हर्सिटी (Technical and Research University) आहे. 1958 मध्ये आयआयटी बॉम्बेची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी देशाच्या विविध भागांतील तज्ज्ञांनी या संस्थेच्या स्थापनेसाठी हातभार लावला होता. अशा तज्ज्ञांपैकी प्रोफेसर आर. एस. अय्यर (Professor R. S. Ayyar) हे एक होते. त्यांनी अगदी सुरुवातीपासून आयआयटी बॉम्बेच्या भरभराटीसाठी काम केलं. माजी प्रोफेसर (Former Professor) अय्यर यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी आणि मुलींनी त्यांची ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. आयआयटी बॉम्बेतील फाउंडिंग फॅकल्टी असलेल्या प्रोफेसर अय्यर यांच्या पत्नी आणि मुलींनी पवई आणि घाटकोपर (Ghatkopar) येथील त्यांचे दोन फ्लॅट (Flat) इन्स्टिट्युटच्या विकासासाठी (Development) दान केले आहेत. त्यांच्या दोन्ही मुली इन्स्टिट्युटच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्या आईसह अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. द टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

गुरुवारी सायंकाळी (5 मे) इन्स्टिट्युटचे डिरेक्टर शुभाषीश चौधरी (Subhasis Chaudhuri) यांच्या उपस्थितीत एका ऑनलाइन कार्यक्रमात इन्स्टिट्युट आणि अय्यर कुटुंब यांच्यातील सामंजस्य करारावर (MoU) सह्या करण्यात आल्या. डीड पेपर्स (The Deed Dapers) या पूर्वीच आयआयटीला देण्यात आले आहेत. ही रक्कम सिव्हिल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटमध्ये (Civil Engineering Department) एक चेअर पोझिशन निर्माण करण्यासाठी आणि कॉन्फरन्स रूम अपग्रेड करण्यासाठी वापरली जाणार आहे. दोन्ही ठिकाणांना प्रोफेसर अय्यर यांचं नाव दिलं जाणार आहे.

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर आरोप; म्हणाले, “सरकारनं OBC आरक्षणाची…”

‘आयआयटी बॉम्बेला माझ्या वडिलांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान होतं. शिवाय आम्हालादेखील या इन्स्टिट्युटनं कौटुंबिक वातावरण दिलं होतं’, अशी प्रतिक्रिया दिवंगत प्रोफेसर आर. एस. अय्यर यांची धाकटी मुलगी जयश्री सुब्रमणी (Jayashree Subrahmoni) यांनी दिली. जयश्री सध्या एका लीडिंग आयटी फर्ममध्ये सीनिअर पोस्टवर कार्यरत आहेत.

गेल्या वर्षी, मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटमध्ये चेअर प्रोफेसर नेमण्यासाठी प्रोफेसर सुबीर कर (Subir Kar) यांच्या पत्नीनं आपली मालमत्ता (पवई येथील फ्लॅट) इन्स्टिट्युला दिली होती. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसली तरी यामुळे प्रोफेसर अय्यर यांच्या मुलींना यातून प्रेरणा मिळाली. ‘2019 मध्ये अय्यर यांचं निधन झाल्यानंतर आम्हाला त्यांच्या नावावर काहीतरी लीगसी (Legacy) तयार करायची होती. याचदरम्यान आम्हाला प्रोफेसर कर यांच्या विलबद्दल माहिती मिळाली. आमच्या वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा हा एक अनोखा मार्ग ठरू शकेल अशी आम्हाला खात्री वाटली,’ अशी माहिती जयश्री यांनी दिली.

प्रोफेसर अय्यर हे स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगमधील (Structural Engineering) भरीव योगदानासाठी ओळखले जातात. ते सिव्हिल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटचे हेड आणि अॅकॅडमिक्स डीन होते. 1993 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. शेल स्ट्रक्चर(Shell Structure), पॉलिमर काँक्रिट (Polymer Concrete) आणि कमी किमतीच्या घरांच्या उभारणीसंबंधी कार्यात त्यांनी योगदान दिलं होतं, अशी माहिती त्यांची मोठी मुलगी रजनी सैगल (Ranjani Saigal) यांनी दिली. ग्रामीण भारतात सर्वात जास्त शाळा चालवण्याचं काम करणाऱ्या यूएस एनजीओची विंग सांभाळण्याचं काम रजनी करतात.

प्रोफेसर अय्यर यांनी 1958 मध्ये आयआयटीमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यांची पत्नी पार्वती अय्यर (Parvathy Ayyar) यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पायाभरणी समारंभासाठी एकत्र आलेल्या फॅकल्टी मेंबर्सची आठवण पार्वती यांनी काढली. सध्या यूएसमध्ये असलेल्या पार्वती अय्यर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, ‘प्रोफेसर अय्यर यांचा महिला सक्षमीकरणावर (Women Empowerment) खरोखर विश्वास होता. माझं लग्न झालं तेव्हा मी फक्त बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. पण, लग्नांतर माझं कॉलेज पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला. मी वयाच्या 28व्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनी मला माझ्या अभ्यासात मदतही (Studies) केली होती. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी इंग्रजी विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवू शकले. त्यांच्यामुळे मला मुंबईतील एसके सोमय्या कॉलेजमध्ये शिकवण्याची संधीही मिळाली.’

मंडपात नवरीनं विचारलं, तुला लग्न का करायचंय? उत्तर ऐकून तिनं असा काही चेहरा केला की…

सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हेड दीपांकर चौधरी (Deepankar Choudhury) म्हणाले की, ‘नव्यानं सुरू केली जाणारी चेअर पोझिशन ‘अॅनॅलिसिस अँड डिझाइन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर युजिंग मेकॅनिक्स’ या विषयातील संशोधन कार्यासाठी असेल. ही पोझिशन प्रोफेसरांचा वारसा पुढे नेण्यास मदत करेल. शिवाय उत्कृष्ट अध्यापन आणि संशोधनाला चालना देण्यासही मदत होईल. प्रोफेसर अय्यर याच गोष्टींसाठी ओळखले जात होते,’ गेल्या वर्षी आयआयटी बॉम्बेतील 1978 च्या बॅचनं सिव्हिल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटमधील गुणवंत (Meritorious) विद्यार्थिनींसाठी त्यांच्या नावानं एक स्कॉलरशीप प्रोग्राम (Scholarship Programme) सुरू केला आहे. या कार्यक्रमाला त्यांचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते, असंही चौधरी यांनी सांगितलं.

प्रोफेसर अय्यर यांच्या पत्नी आणि मुलींनी घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक होत आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मुंबई

मुंबई

Published by:Pooja Vichare

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/mumbai/iit-bomaby-2-mumbai-flats-donated-by-founding-faculty-members-family-gh-mhpv-699718.html