मुंबई बातम्या

फक्त दोन चुका आणि मुंबई इंडियन्ससाठी व्हिलन ठरला रोहित शर्मा; पाहा झाले तरी काय – Maharashtra Times

मुंबई: मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासात सुरुवातीच्या सलग सहा सामन्यात पराभूत होणारा पहिला संघ ठरला आहे. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा ३ विकेटनी पराभव झाला. मुंबईच्या या पराभवानंतर जर कोणाला जबाबदार धरले पाहिजे तर सर्वात पहिले नाव कर्णधार रोहित शर्माचे समोर येते. जाणून घ्या मुंबईच्या सलग सातव्या पराभवाला हिटमॅन कसा काय जबाबदार…

वाचा- अर्जुन तेंडुलकरकडून शिकला CSKचा गोलंदाज; ईशान किशनला गुडघे…

हंगामात सलग सहाव्यांदा अपयश

रोहित शर्मासाठी आयपीएलचा हा हंगाम एखाद्या वाईट स्वप्नासारखा आहे. फलंदाज म्हणून तो सलग सहाव्यांदा अपयशी ठरलाय. चेन्नईविरुद्ध दोन चेंडू खेळाडू रोहित शून्यावर बाद झाला. या हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने ४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर एकदाही ३० धावांचा टप्पा पार केला नाही. ३ वेळा तो दुहेरी धावसंख्या करू शकला नाही.

वाचा- निराश रोहित म्हणाला, ‘आपल्या सर्वांना माहिती आहे तो काय करू शकतो’

फलंदाजी बरोबरच कर्णधार म्हणून रोहित चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरला. आयपीएलमध्ये सर्वांना माहिती आहे की धोनीला जयदेव उनाडकटची धुलाई करण्यात मजा येते. २०१९च्या आयपीएलमध्ये धोनीने जयदेवची जाम धुलाई केली होती. हा इतिहास फार जुना नसताना रोहितने अखेरची ओव्हर जयदेवला दिली. याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. धोनीने यावेळी इतिहास बदलू दिला नाही. रोहित शर्माच्या या दोन चुकांमुळे ज्या मुंबई इंडियन्सला त्याने पाच वेळा चॅम्पियन केले त्याच संघाच्या पराभवाला तो जबाबदार ठरला.

वाचा- मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर सचिन तेंडुलकरने दिली पहिली प्रतिक्रिया; सांगितले पराभवाचे

चेन्नईविरुद्ध मुंबईच्या फलंदाजांना मोठे अपयश आले. एकटा तिलक वर्मा वगळता अन्य कोणीही धावा करण्याचा प्रयत्न केला नाही. स्टार फलंदाज ईशान किशन शून्यावर बाद झाला. डेवाल्ड ब्रेविस ४ तर पोलार्ड १४ धावांवर माघारी परतला.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/rohit-sharma-responsible-of-mumbai-indians-defeat-jaydev-unadkat-had-to-give-the-last-over-in-front-of-dhoni-got-out-without-opening-the-account/articleshow/91007755.cms