मुंबई बातम्या

मुंबई ट्रान्स हार्बरच्या कामाचा वेग वाढणार – Sakal

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आलेल्या मुंबई ट्रान्स हार्बरलिंक (एमटीएचएल) प्रकल्पाचे काम पॅकेज १, २ व ३ अशा तीन भागांमध्ये प्रगतिपथावर आहे.

मुंबई
sakal_logo

By

मुंबई – देशातील सर्वात मोठा सागरी सेतू (Sea Bridge) आलेल्या मुंबई ट्रान्स हार्बरलिंक (एमटीएचएल) (MTHL) प्रकल्पाचे (Project) काम पॅकेज १, २ व ३ अशा तीन भागांमध्ये प्रगतिपथावर आहे. सद्यस्थितीत तिन्ही पॅकेज मिळून ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे; तर संपूर्ण काम सप्टेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याचे नियोजित केले आहे. या प्रकल्पाच्या डेक स्लॅबपर्यंतचे काम पूर्ण झाल्याने बांधकाम साहित्याची वाहतूक करणे सोयीचे झाले आहे. परिणामी प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढणार आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी मुंबई पारबंदर प्रकल्प भाग-१ च्या शिवडी येथे प्रकल्पाची पाहणी केली. शिवडी येथील ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या ६ आंतरबदलापैकी सी-२ रॅम्पचे काम सबबेसपर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच, रॅम्पपासून मूळ पुलाच्या ४ किलोमीटर अंतराच्या गाळाचे डेक स्लॅबपर्यंत काम पूर्ण झाले आहे.

काम पूर्ण झाल्यामुळे कंत्राटदाराला त्याच्या बांधकाम साहित्याची वाहतूक करणे सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे पुढील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या बांधकामाचा वेग वाढणार आहे. यापूर्वी पुलाच्या कामाकरिता व पाहणीकरिता तात्पुरत्या स्वरूपाच्या पुलाचा व लिफ्टचा वापर करण्यात येत होता. सध्या मुंबईच्या रस्त्यावरून मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या मुख्य पुलावरून वाहनाने जाणे शक्य असल्यामुळे हा एक मैलाचा दगड आहे, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

…असा आहे मार्ग

1 एमएमआरडीएतर्फे एकूण २१.८ किलोमीटर लांबीच्या, सहा लेनच्या या समुद्री मार्गाचे बांधकाम सुरू आहे. यात १६.५ किलोमीटरचा समुद्रातून जाणारा मार्ग आणि उर्वरित ५.३ किलोमीटरचा रस्ता आहे. यातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरांना जोडले जाणार आहे.

2 ट्रान्सहार्बर लिंक मार्ग प्रत्यक्षात आल्यास मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्यता आहे. हा मार्ग मध्य मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजी नगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग ४-बी वरील चिरले येथे जोडला जाईल. यावरून दररोज सुमारे ७० हजार वाहनांची ये-जा होण्याचा अंदाज आहे.

Web Title: Work On Mumbai Trans Harbor Will Accelerate

Source: https://www.esakal.com/mumbai/work-on-mumbai-trans-harbor-will-accelerate-pjp78