मुंबई बातम्या

चौथा सामना सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का, आता पराभव होणार जवळपास पक्का… – Maharashtra Times

पुणे : मुंबई इंडियन्सला आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये आपले गुणांचे खाते उघडता आलेले नाही. आतापर्यंच्या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पण आता चौथा सामना सुरु होण्यापूर्वीच मुंबईच्या संघासाठी एक वाईट बातमी आली आहे.
चौथ्या सामन्यापूर्वीच मुंबईच्या संघासाठी कोणती वाईट बातमी आली, पाहा…
मुंबईच्या संघाला काहीही करून चौथा सामना जिंकवा लागणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या मुंबईची गोलंदाजी ही कमकुवत समजली जाते. चौथ्या सामन्यात मुंबईची गोलंदाजी अजून कमकुवत झालेली पाहायला मिळू शकते. कारण आता चौथ्या सामन्यात आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचे संघात प्रवेश करणार आहे. ममॅक्सवेल हा आपल्या धमाकेदार फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळेच आरसीबीच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात ठेवला आहे. यापूर्वी आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस दमदार फलंदाजी करत होता, पण त्याला चांगली साथ मिळत नव्हती. पण आता मॅक्सवेल संघात आल्यामुळे आरसीबीची फलंदाजी अधिक बळकट झालेली आहे. त्यामुळे मुंबईच्या कमकुवत गोलंदाजीचा या सामन्यात निभाव लागणार नाही, असे चाहते म्हणत आहेत. गेल्या हंगामातही मॅक्सवेलने धडाकेबाज फटकेबाजी केली होती. यावेळी तर मॅक्सवेल लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरणार आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात मॅक्सवेल कशी फलंदाजी करतो, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल. पहिल्या ३ लढती गमावलेल्या मुंबईला पहिल्या विजयाची प्रतिक्षा असेल. पराभवाच्या हॅटट्रिकच्या धक्क्यातून बाहेर येऊन पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईचा प्रयत्न विजय मिळवण्याचा असेल. दोन्ही संघात आतापर्यंत २९ लढती झाल्या आहेत यापैकी १७ वेळा मुंबई तर १२ वेळा आरसीबीने बाजी मारली आहे. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार होईल, असे दिसत आहे. मुंबईचा संघ आजचा सामना जिंकून या आयपीएलमधील पहिला विजय नोंदवतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेलच. पण दुसरीकडे मॅक्सवेल या सामन्यात लक्षवेधी ठरेल.
संभाव्या संघ
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, फॅबियन एलन/डॅनियल सॅम्स, एम.अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट/बेसिल थंपी.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, डेव्हिड विली, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/big-blow-to-mumbai-indians-before-the-4th-match-against-royal-challengers-bengaluru-in-ipl-2022/articleshow/90746686.cms