मुंबई बातम्या

Mumbai Bank scam : प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांची नोटीस, चौकशी होणार – Sakal

महाराष्ट्र
sakal_logo

By

मुंबै बँक मजूर प्रकरणात काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली आहे. दरेकर यांनी मुंबै बँकेची निवडणूकीसाठी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. परंतु सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतर प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचं सांगत त्यांना अपात्र ठरवलं आहे. यावर न्यायालयाकडून सुनावणी सुरु असून सोमवारी (4 एप्रिल) मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता यावर कोणती सुनावणी होणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, मागली अनेक दिवसांपासून मुबै बॅंकेचे प्रकरण सुरु आहे.

हेही वाचा: “साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?”

दरम्यान, आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून त्यांना सोमवारी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

प्रवीण दरेकर यांना दोन आठवड्यांचा दिलासा

मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचा दिलासा दिला आहे. दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावर 29 मार्च रोजी हायकोर्टात वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचे वकील अखिलेश चौबे यांनी पुढील सुनावणीपर्यंत दिलेला दिलासा कायम ठेवण्याची मागणी कोर्टाकडे केली. न्यायमूर्ती अनूजा प्रभूदेसाई यांनी ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्याआधी मुंबई सत्र न्यायालयाने 25 मार्च रोजी दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र या निकालाल हायकोर्टात आव्हान देता यावं यासाठी 29 मार्चपर्यंत त्यांना अटकेपासून दिलेला दिलासा त्यापुढील दोन आठवडे (12 एप्रिल) कायम ठेवला आहे.

हेही वाचा: प्रवीण दरेकर मजूर नाहीत; सहकार विभागाने ठरवलं अपात्र

Web Title: Mumbai Bank Scam Issued Notice To Pravin Darekar For Labour Case

Source: https://www.esakal.com/maharashtra/mumbai-bank-scam-issued-notice-to-pravin-darekar-for-labour-case-sbk97