मुंबई बातम्या

असं स्वागत फक्त मुंबईकरच करू शकतात; मनं कसं जिंकायचे हे मुंबई इंडियन्सकडून शिकावं – Maharashtra Times

मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामाला येत्या २६ मार्चपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेतील साखळी फेरीतील ७० सामने मुंबई आणि पुणे येथे होतील. गेल्या वर्षी करोनाचा बायोबबलमध्ये शिरकाव झाल्याने स्पर्धा स्थगित करावी लागली होती. त्यामुळेच बीसीसीआयने या वर्षी स्पर्धा चार स्टेडियमवर आयोजित करण्याचे ठरवले आहे.

वाचा- ISL Final: इंडियन सुपर लीगला मिळाला नवा विजेता, पेनाल्टी शूटआउटमध्ये हैदराबादचा थरारक

आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्सचा संघ या वर्षी देखील फेव्हरेट मानला जातो. मुंबई इंडियन्सचा संघ हा एका कुटुंबाप्रमाणे आहे. संघातील सर्व खेळाडू आणि स्टाफ यांना ते #OneFamily मानतात. मैदानावर असो की मैदानाबाहेर मुंबई इंडियन्सची स्टाईल ही सर्वांपेक्षा हटके असते. आयपीएलच्या १५व्या हंगामाला सुरूवात होण्याआधी मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील अन्य ९ संघांचे त्याच्या घरच्या शहरात जंगी स्वागत केले आहे.

वाचा- सेहवाग भेटला तर तो खूप मार खाईल; पाकिस्तानच्या खेळाडूचे वक्तव्य

मुंबई इंडियन्सने मुंबई शहरातील रस्त्यांवर प्रत्येक संघासाठी खास मेसेजसह एक होर्डिंग्स लावले आहे. Dil Khol Ke या टॅग लाईनसह लावण्यात आलेल्या होर्डिंग्समुळे मुंबई इंडियन्स संघाचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या होर्डिंगचे फोटो शेअर केले आहेत.

वाचा- Mumbai Indians SWOT Analysis: मुंबई इंडियन्सला सर्वात धोका या गोष्टीचा,बसू शकतो मोठा फटका;

आयपीएलची पहिली लढत २६ मार्च रोजी होईल. तर मुंबई इंडियन्सची पहिली लढत २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ब्रबॉर्न स्टेडियवर होईल. मुंबईचा संघ कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ, चेन्नई यांच्याशी प्रत्येकी दोन वेळा तर हैदराबाद, बेंगळुरू, पंजाब आणि गुजरातविरुद्ध एकच सामना खेळणार आहे.

मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२२चे वेळापत्रक (IPL 2022Mumbai Indians Schedule)

२७ मार्च- विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स , ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३०
०२ एप्रिल- विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डीवाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३०
०६ एप्रिल- विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, एमसीए स्टेडियम, रात्री ७.३०
१३ एप्रिल- विरुद्ध पंजाब किंग्ज, एमसीए स्टेडियम, रात्री ७.३०
२१ एप्रिल- विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०
२४ एप्रिल- विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, वानखेडे स्टेडिमय, रात्री ७.३०
३० एप्रिल- विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०
०६ मे- विरुद्ध अहमदाबाद टायटन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, रात्री ७.३०
०९ मे- विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स , डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०
१२ मे- विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, वानखेडे स्टेडियम, रात्री ७.३०
१७ मे- विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, रात्री ७.३०
२१ मे- विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डीवाय पाटील स्टेडियम, रात्री ७.३०

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/ipl-2022-mumbai-indians-with-separate-hoardings-to-welcome-all-the-9-franchises-into-mumbai/articleshow/90347526.cms