मुंबई बातम्या

corona in mumbai: मुंबईत करोना रुग्णसंख्या नियंत्रणात; पाहा, आज किती रुग्ण रुग्णालयात दाखल! – Maharashtra Times

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत होता. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार आज एकूण ११९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आज ०१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत आज २५७ करोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. आज निदान झालेल्या एकूण ११९ रुग्णांपैकी २१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरीत रुग्णांमध्ये लक्षणे नसल्याकारणाने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. (mumbai registered 119 new cases in a day with 257 patients recovered and 01 death today)

मुंबईतील एकूण बाधितांपैकी आतापर्यंत एकूण १० लाख ३५ हजार ४२६ रुग्ण बरे झाले आहेत. या बरोबरच मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आहे ९८ टक्के. तर मुंबईत आज एकूण १ हजार ०८८ रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा ४ हजार ०१९ दिवसांचा आहे. तर मुंबईत १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत रुग्णवाढ ०.०२ टक्के इतकी आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का?; भाजप आक्रमक

सध्या मुंबईत एकही इमारत सील करण्यात आलेली नसून आज नव्याने सापडलेल्या ११९ रुग्णांपैकी २१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई पालिकेकडील ३६ हजार २४९ बेड्सपैकी केवळ ७३९ बेडचा वापर करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- रशिया-युक्रेन युद्धानंतर राज्यात हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांनी ‘दिल्या’ या सूचना

मुंबईतील संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

> २४ तासात बाधित रुग्ण- ११९
> २४ तासात बरे झालेले रुग्ण- २५७
> बरे झालेले एकूण रुग्ण- १०३५४२६
> बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८%
> एकूण सक्रिय रुग्ण- १०८८
> दुप्पटीचा दर- ४०१९ दिवस
> कोविड वाढीचा दर ( १७ फेब्रुवारी- २३ फेब्रुवारी)-०.०२%

क्लिक करा आणि वाचा- ९ वर्षीय रेवाचा नवा विक्रम; एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया अवघ्या २ तास ४४ मिनिटांत पार

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-update-mumbai-registered-119-new-cases-in-a-day-with-257-patients-recovered-and-01-death-today/articleshow/89806543.cms