मुंबई बातम्या

Mumbai Unlock : मुंबई होणार ‘अनलॉक’?; पण नेमकं कधी? – Maharashtra Times

मुंबई: करोनाकाळात कोट्यवधी मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मुंबई लवकरच निर्बंधमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत महापालिकेकडून देण्यात येत आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत मुंबईतील सर्व निर्बंध शिथील केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांनी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबरोबरच इतर कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी मुंबईतील करोना निर्बंध हटवण्याबाबत संकेत दिले आहेत. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत निर्बंध हटवले जाण्याची शक्यता आहे. याबाबत विचार सुरू आहे. मात्र, महत्वाची बाब म्हणजे नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या.

मुंंबई: BMC च्या भूखंडावर खासगी कॅन्सर हॉस्पिटल, ‘यांना’ मिळणार मोफत उपचार
image‘नमस्ते ट्रम्प’मुळं देशात करोना पसरला; PM मोदी जबाबदार: नवाब मलिक

डिसेंबरच्या अखेरीस ओमिक्रॉन लाट आल्यानंतर पहिल्यांदाच, मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या खाली आली आहे. सोमवारी मुंबईत ३५६ रुग्णांची नोंद झाली. तर राज्यातील रुग्णसंख्या ३९ दिवसांनंतर निचांकीवर आली आहे.

दरम्यान, मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येमध्ये वेगाने घट झाली असून सोमवारी ३५६ करोनाबाधितांची नोंद झाली. या रुग्णांपैकी ३१३ रुग्णांना कोणत्याही प्रकारची करोनाची लक्षणे नसून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्याही कमी म्हणजे चाळीस इतकी नोंदवण्यात आली आहे. ऑक्सिजनची गरज मागील काही आठवड्यांपासून वाढती होती. गेल्या २४ तासांत दहा रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागली असून ९४९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

imagecoronavirus laetst update: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आज करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ३५६ वर
imagecoronavirus update करोना: राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या ६ हजारांवर आली, १८ हजारांवर रुग्ण झाले बरे

पुढील चार दिवस महत्त्वाचे

पुढील चार दिवसांत रुग्णसंख्येमध्ये कसा चढउतार होतो ते पाहणे महत्त्वाचे आहे, याकडे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आशीष मोंडे यांनी लक्ष वेधले. यापूर्वीची रुग्णसंख्या पाहिली तर सोमवारी रुग्णांची संख्या तुलनेने कमी नोंदवली जाते. त्यामुळे पुढील चार दिवस ही रुग्णसंख्येतील घट कायम राहिली तर करोनासंसर्ग नियंत्रणात आल्याचे सांगता येईल, असे त्यांनी सांगितले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-will-be-unlocked-by-february-end-lift-all-covid-19-restrictions-in-city-hints-bmc/articleshow/89425750.cms