मुंबई बातम्या

मुंबई बजेट २०२२-२३ : ‘सर्वांसाठी पाणी’ ही घोषणा आश्वासनांमध्येच बुडणार? – MahaMTB

मुंबई : ‘सर्वांसाठी पाणी’ ही घोषणा घेऊन मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आला आहे. पण सर्वांसाठी पाणी कुठून आणि कसे देणार? याबाबत महानगरपालिकेची तरतूद काय, याबददल या अर्थसंकल्पात काही एक स्पष्टता नाही. पुर्नविकासामुळे नव्याने बांधले गेलेल्या इमारती, त्यातली वाढती लोकसंख्या, अतिक्रमण, आजही देशाच्या विविध भागांतून मुंबईत येणारा अन्य नागरिकांचा लोंढा.

या सगळ्यांना पुरेल इतके पाण्याचे नियोजन महानगरपालिका करू शकते का? दुषित, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा. रात्री बेरात्री असणार्‍या पाणी वितरणाच्या वेळा, पाण्याची नळजोडणी मिळण्यात अडचणी, त्यामुळे विकत घ्यावे लागणारे पाणी, पाणी माफियांची दादागिरी, यांमुळे मुंबईकरांचे जगणे नरक झाले. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात सगळ्याना पाणी देण्याचे केवळ आश्वासन आहे. मात्र, या सर्वांसाठी असलेल्या पाण्याचेे वितरण कसे कुठे आणि केव्हा करणार, याचा विचार करता महानगरपालिकेची सर्वांसाठी पाणी ही घोषणा खोट्या आश्वासनांमध्येच बुडणार का,? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/2/3/Mumbai-Budget-2022-23-Will-the-slogan-Water-for-All-sink-into-promises.html