मुंबई बातम्या

मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प २०२२-२०२३: चाळींमधील स्वतंत्र शौचालयासाठी काहीच नाही – MahaMTB

                                    

 

bmc

मुंबई : मुंबईकरांना दर्जेदार जीवनमान देणे आणि सुसह्य जीवनशैली मिळावी यावर लक्ष केंद्रीत करून मुंबई महापालिका अर्थसंकल्प तयार केल्याचे पालिकेचे म्हणणेआहे. परंतु, सत्य परिस्थिती काही वेगळेच सांगते. मुंबईतील गिरणगाव भागात, दादर, माहिम, कुर्ला, घाटकोपर आदी परिसरात चाळीत राहणार्‍या लाखोमध्यमवर्गीय लोकांसाठी पालिकेची काहिच तरतुद दिसत नाही. आजही अनेक चाळींमध्ये स्वतंत्र शौचालयाची सुविधा आहे. परंतु, या स्वतंत्र शौचालयाच्या डागडुजीबाबत पालिकेने काहीच उपाययोजना या अर्थसंकल्पात केली नसल्याचे दिसते.

कोरोना काळात या स्वतंत्र शौचालयावरही पालिकेने निर्बंधलावल्याने घरातील ज्येष्ठांसोबतच लहान मुले आणि महिलांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. एकीकडे प्रत्येक पायाभूत सुविधेसाठी कोटींच्या घरात खर्च दाखवायचा, मात्र प्रत्यक्षात नक्की कोणत्या पायाभूत सुविधांसाठी इतका मोठा खर्च? असा प्रश्न उभा राहतो.

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/2/3/Public-Health-Mumbai-Municipal-Corporation-Budget-2022-2023.html