मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेबाबत मोठी घडामोड; सात मार्चला संपणार मुदत – Sarkarnama (सरकारनामा)

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभागरचना आराखडय़ाला मंजुरी मिळाली आहे. यानंतर आता मुंबईसह उपनगरातील 236 वॉर्डांच्या निवडणुका कधी जाहीर होणार, याकडे मुंबंईकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान 7 मार्च रोजी मुंबई महापालिकेची मुदत संपत असल्याने एप्रिलअखेर किंवा मेमध्ये निवडणूका जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्याचबरोबर, मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च रोजी संपत आहे.या मधल्या कालावधीसाठी नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि केंद्र व राज्य सरकारच्या कायद्यानुसार ही मुदतवाढ मिळणे जवळपास अशक्य मानले जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमला जाणार हे निश्चित झाले आहे.

Source: https://www.sarkarnama.in/mumbai/mumbai-municipal-corporations-term-will-end-on-march-7-as91