मुंबई बातम्या

मुंबईतील पहिला ‘सेफ स्कूल झोन’ प्रकल्प यशस्वी – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबईतील पहिला सेफ स्कूल झोन पायलट प्रोजेक्ट
  • ९३ टक्के मुलांनी सांगितले आपले अनुभव
  • अपघात होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी

Mumbai first Safe School Zone: शाळेजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांनी होणाऱ्या अपघातामुळे अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास घाबरतात. मुलांचा अपघात होऊ नये ही भीती पालकांच्या मनात कायम असते. हे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने (BMC) सेफ स्कूल झोनचा प्रकल्प राबवला असून याचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे.

मुंबईतील पहिल्या सेफ स्कूल झोन प्रकल्पाशी संबंधित सर्वेक्षण प्रसिद्ध झाले आहे. या सर्वेक्षणात मुंबईतील भायखळा येथील क्राइस्ट चर्च शाळेतील ९३ टक्के मुलांनी आपले अनुभव सांगितले. ‘शाळेत जाणे पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि सोपे झाले आहे. आता आम्ही शाळेसमोरील रस्त्यावर मोकळेपणाने फिरू शकतो’, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या सेफ स्कूल झोनमुळे शाळेजवळ अपघात होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी झाली आहे. पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या झेब्रा क्रॉसिंगमध्ये ९.८ टक्के वाहने आपला वेग कमी करत असल्याचे दिसले. या नव्या प्रकारच्या झेब्रा क्रॉसिंगमध्ये आता ४१ टक्के वाहनचालकांनी वाहनांचा वेग कमी केल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांसाठी अनुकूल आणि चालण्यायोग्य स्कूल झोन तयार करण्याचे हे याचे उद्दिष्ट आहे. पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर आता उर्वरित शाळांच्या बाहेर सुरक्षित शाळा झोन तयार करण्यात येणार आहेत.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, ६७ हजारपर्यंत मिळेल पगार
imageRailTel मध्ये तरुणांसाठी बंपर भरती, १ लाख ८० हजारपर्यंत मिळेल पगार
पालिका आणि ट्रॅफिक पोलिसांनी वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (WRI), इंडिया रॉस सेंटरसोबत भायखळा परिसरातील मिर्झा गालिब मार्ग येथे सेफ स्कूल झोनचा हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला. हा प्रकल्प ग्लोबल सेफ्टी प्रोजेक्टसाठी ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपी इनिशिएटिव्हचा एक भाग आहे. मुंबईत मुलांसाठी अनुकूल आणि चालण्यायोग्य शाळा क्षेत्र तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

आता इतर शाळांसमोरही ‘सेफ स्कूल झोन’ तयार केले जाणार आहेत. हा प्रकल्प रस्त्यावरून चालणाऱ्या शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी खास तयार करण्यात आला असला तरी तो मुलांसाठी तसेच इतर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सुलभ रस्ता उपलब्ध करून देत असल्याचे दिसून येत आहे.

imageMMRDA Recruitment: मुंबई मेट्रोमध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील
imageESIC Recruitment: राज्य विमा महामंडळात बंपर भरती, जाणून घ्या तपशील
या प्रकल्पात कोन, बॅरिकेड्स, प्लांटर्स, खडू आणि पेंटचा वापर करण्यात आला आहे. या सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींमुळे शाळेसाठी सुरक्षित क्षेत्र तयार करण्यात आले. वाहतुकीला दिशा देण्यात आली. त्यांचे वेगाचे नियम ठरलेले होते. रस्त्यावरून चालण्यासाठी आणि रस्ता ओलांडण्यासाठी कोपरे निश्चित करण्यात आले होते. अशाप्रकारे भायखळा येथील या शाळेजवळील रस्त्यावर या आदर्श प्रयोगाने पहिले पाऊल टाकले आहे. यापुढे इतर शाळांसमोरील रस्त्यांवरही हा प्रयोग पुन्हा करण्याचे लक्ष्य बीएमसीने ठेवले आहे.

imageGovernment Job: स्टाफ सिलेक्शन अंतर्गत विविध पदांची भरती
imageBank Job 2022: सिडबीमध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-first-safe-school-zone-project-was-successful-93-percent-children-said-that-it-is-safer-and-easier-to-walk-on-the-streets/articleshow/89086644.cms