मुंबई बातम्या

मुंबई : उपनगरांच्या तुलनेत शहर अधिक दमट | Mumbai news update – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : मुंबईतील उपनगरे (Mumbai suburban) आणि शहर यांमधील तापमानात (Temperature in mumbai) सुमारे 4 अंशाचा फरक जाणवत आहे. उपनगरांच्या तुलनेत शहर अधिक दमट असून हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के एस होसाळीकर (K S hosalikar) यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. (Mumbai city temperature update)

हेही वाचा: महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण: देशपांडे यांची दोष मुक्ततेसाठी हायकोर्टात याचिका

काल सांताक्रूझ 31.9 तर कुलाबा 27.4 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तर आद्रता अनुक्रमे 55 व 78 टक्के नोंदवली गेली. तरा आज कमाल तापमान सांताक्रूझ 31.3 तर कुलाबा 29 अंश सेल्सियस नोंदवले गेले. तर आद्रता अनुक्रमे 44 व 72 टक्के नोंदवली गेली. उपनगराच्या तुलनेत शहरामध्ये आद्रता अधिक आहे.

गेल्या दोन दिवसात आद्रतेमध्ये वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे शहरात उकाडा अधिक जाणवत आहे. हिवाळ्यात शक्यतो जमिनीकडून समुद्राच्या दिशेने हवा वाहत असते. मात्र सध्या हवेचा वेग प्रचंड मंदावला आहे. त्यातच धुळीकणाचं प्रमान ही वाढलं आहे. त्यामुळे शहरातील हवेत दमटपणा वाढला आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-city-temperature-update-mumbai-climate-news-update-nss91