मुंबई बातम्या

Nitesh Rane : ‘नितेश राणे हरवलेत, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस’; मुंबईत बॅनरबाजी – Lokmat

BJP MLA Nitesh Rane : शिवसैनिक हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे व संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी तिसऱ्या दिवशी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी फेटाळून लावला आहे. यात राणे यांचा मोबाईल हस्तगत करणे आवश्यक असल्याचे कारण देत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. आता यावरून मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

मुंबईतील चर्चगेट या स्थानकाबाहेर नितेश राणे यांच्या फोटोसह एक बॅनर लावण्यात आला आहे. तसंच यात नितेश राणे हरवले असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस म्हणून देण्यात येईल, असंही बॅनरवर नमूद करण्यात आलंय. दरम्यान, हे बॅनर कोणी लावले याबद्दल मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

परब यांच्यावर झाला होता हल्ला
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी खुनी हल्ला झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा संशयिताना अटक केली आहे. यामध्ये स्वाभिमानचे पुणे येथील कार्यकर्ते सचिन सातपुते यांना अटक केल्यानंतर पोलिसांची चक्रे आमदार राणे व सावंत यांच्या दिशेने फिरली होती. त्यामुळे या दोघांनी २७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. 

मोबाईल हस्तगत करणे गरजेचे
या प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल हस्तगत करणे आवश्यक आहे, तसेच याची खास चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Web Title: bjp leader Nitesh Rane lost chicken reward to informant Banners in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/mumbai/bjp-leader-nitesh-rane-lost-chicken-reward-informant-banners-mumbai-a720/