मुंबई बातम्या

Mumbai Corona Update | मुंबईत कोरोनाचा हाहाकार, दिवसभरात किती रुग्ण? – Zee २४ तास

मुंबई : मुंबईकरांसाठी अतिशय चिंताजनक अशी बातमी आहे. मुंबईत कोरोनाचा उद्रेक (Mumbai Corona Update) झालेला आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काल राज्यात जितके रुग्ण आढळले होते, तितकेच रुग्ण आज मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील आजची रुग्णसंख्या ही 3 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे निश्चितच पालिका प्रशासन सतर्क झाली आहे. (mumbai corona update today 30 december 2021 3 thousand 671 corona patients found) 

आजची रुग्णसंख्या किती? 

मुंबईत आज गुरुवार (30 डिसेंबर) 3 हजार 928 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. बीएमसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईत बुधवार 29 डिसेंबरच्या तुलनेत हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. मुंबईत बुधवारी 2 हजार 510 रुग्ण आढळले होते. 

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-corona-update-today-30-december-2021-3-thousand-671-corona-patients-found/598908