मुंबई बातम्या

मुंबई : कोरोना नियम मोडणाऱ्या हॉटेल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल | Mumbai crime update – Sakal

मुंबई : कोरोना नियम मोडणाऱ्या हॉटेल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

मुंबई
sakal_logo

By

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या (corona rules breaking) एका हॉटेल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल (Police complaint against manager) करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देण्यात आला होता. गावदेवी पोलीस स्टेशनच्या (Gamdevi police station) हद्दीत असणारे अॅथमस असं हॉटेलचं नाव आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकार (Mva Government) आणि मुंबई पोलिसांनी (mumbai police) नागरिकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. (Police complaint filed against hotel manager imran bhatkar for breaking corona rules)

हेही वाचा: एसटी संपासाठी गोळा केलेले पैसे गेले कुठे?कर्मचाऱ्यांचा सवाल

यात मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आल़्यामुळं पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र नाही येऊ शकत, तसंच हॉटेल्समध्येही संपूर्ण क्षमतेच्या फक्त 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा असा नियम लागू करण्यात आलेला आहे. तरीही मुंबईच्या काही हॉटेल्समध्ये या नियमांचं उल्लंघन होत आहे़. अशाच पद्धतीनं मुंबईतल्या गावदेवी भागात अॅमथस हॉटेलमध्येही कोरोनाच्या नियमांचं पालन केलं जात नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला तेव्हा, हॉटेलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आढळून आली. तसंच हॉटेलमध्ये सोशल डिस्टंसिंगचं कुठेही पालन होताना दिसत नव्हते, तसंच हॉटेलच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझरही ठेवलेलं नव्हतं. येताना जाताना कुणीही ग्राहक मास्क लावत नव्हते. पोलिसांनी हॉटेल मॅनेजरला या सगळ्या नियमांबद्दल विचारपुस केली, तेव्हा त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली.

पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. इमरान भाटकर असं मॅनेजरचं नाव असून त्याच्यावर भा द विच़्या कलम 188, 269, तसंच महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 135, 37(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचे नियम न पाळल्याबद्दल हॉटेलवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहीती पोलिसांनी दिली आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/police-complaint-filed-against-hotel-manager-imran-bhatkar-for-breaking-corona-rules-mumbai-crime-update-nss91