मुंबई बातम्या

Mumbai Local Train : ‘त्यांना’ मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी नाहीच; राज्य सरकारची भूमिका – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार का?
  • राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात मांडली भूमिका
  • दोन्ही डोस घेतल्याशिवाय मुंबई लोकलने प्रवास करण्यास परवानगी देता येणार नाहीच
  • परवानगी दिली तर, करोनाचा उद्रेक पुन्हा होऊ शकतो – राज्य सरकार

मुंबई: नागरिकांना मुंबईतील उपनगरीय लोकलमधून लसीकरण प्रमाणपत्राविना प्रवासाला परवानगी मिळेल की नाही, यावर राज्य सरकारने आज, बुधवारी मुंबई हायकोर्टात भूमिका स्पष्ट केली आहे. लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यक्तींना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली तर, पुन्हा करोनाचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे प्रवासाची परवानगी देता येणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य सरकारचा हा सक्तीचा धोरणात्मक निर्णय बेकायदा आणि मुलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा आहे, असे सांगतानाच, याविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत हायकोर्टात सुनावणी घेण्यात आली. याचिकांमधील मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा अवधी देण्याची विनंती सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने केली होती. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देताना याबाबतची सुनावणी आज ठेवली होती. त्यानुसार, सरकारने आपली भूमिका मुंबई हायकोर्टात मांडली आहे. लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यक्तींना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली तर, पुन्हा करोनाचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे प्रवासाची परवानगी देता येणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तसेच याचिकादारांना उत्तर देण्याचे निर्देश देतानाच, खंडपीठाने पुढील सुनावणी ३ जानेवारी २०२२ रोजी ठेवली आहे.

‘तुमच्या फडणवीसबाई नेहमी लाईमलाईटमध्ये असतात, मग त्यांनाच विरोधी पक्षनेतेपद द्या’
imageभास्कर जाधवांकडून सभागृहात पंतप्रधान मोदींची नक्कल, फडणवीस कमालीचे संतापले; म्हणाले….

याचिकेत काय?

‘करोना प्रतिबंधक लस घेणे हे ऐच्छिक आहे आणि असे असताना, तसेच केंद्र सरकारनेच ही भूमिका लोकसभेत स्पष्ट केलेली असताना, मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेऊन त्याचे प्रमाणपत्र दाखवणे प्रवाशांना बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारचा हा धोरणात्मक निर्णय बेकायदा, तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ अन्वये (समानतेचा हक्क) व अनुच्छेद २१ अन्वये (जीवन जगण्याचा हक्क) असलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा आहे’, असे याचिकांमध्ये म्हटलेले आहे. फिरोज मिठिबोरवाला आणि ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’चे सदस्य योहान टेंग्रा यांनी या दोन जनहित याचिका दाखल केल्या आहेत.

imageफडणवीसांकडून आरोपांच्या फैरी, पटोलेंनी आव्हान स्वीकारलं; म्हणाले, आता होऊनच जाऊ द्या
imageमुंबईतील उपनगरी लोकलमधून लसीकरण प्रमाणपत्राविना प्रवासाला लोकलमुभा?

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/corona-in-maharashtra-without-vaccination-certificate-no-permission-grant-for-commuters-in-mumbai-local-train-government-says-in-bombay-high-court/articleshow/88430858.cms