मुंबई बातम्या

मुंबईतील शाळा सुरू होण्याबाबत अखेर ठरलं! महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांची महत्वाची माहिती – Sakal

महाराष्ट्र
sakal_logo

By

मुंबई : ओमिक्रॉनच्या (omicron) पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर अखेर शाळा (school start) सुरु होण्याबाबतची महत्वाची बातमी समोर आलीय. मुंबई महापालिकेच्या (mumbai muncipal corporation) शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश

ओमायक्रॉनमुळे पालकांचा पाल्यांना शाळेत पाठवण्यास नकार आहे. शाळा नवीन वर्षात सुरु करण्यात याव्यात, अशी त्यांनी मागणी केली होती. शाळांकडून सूचना न मिळाल्याने पालक संभ्रमात होते. मात्र यावर आता महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी याबाबत स्पष्ट केले आहे. मुंबईत उद्यापासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होणार आहेत. याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना मुंबई महापालिकेचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्यापासून म्हणजे 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांना मुंबई महापालिकेने तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र शाळा सुरू होण्यास एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. तर, पालकांच्या मनातही ओमायक्रॉनविषयी भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा: परवानगीशिवाय होर्डिंग लावल्यास 40 हजारांचा दंड, मालमत्तेवरही बोजा

मुंबईतील शाळा उद्यापासूनच सुरू होणार, शाळेबाबत कुठलाही संभ्रम बाळगू नये अशी माहिती मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

हेही वाचा: अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव, पटोलेंनी राजीनामा द्यावा – बावनकुळे

Source: https://www.esakal.com/maharashtra/schools-in-mumbai-will-start-instructions-of-municipal-corporation-marathi-news-jpd93