मुंबई बातम्या

Omicron : मुंबई विमानतळावर आतपर्यंत ८०० जणांची RTPCR चाचणी! – Loksatta

आरोग्यमंत्री टोपेंनी दिली माहिती ; यापैकी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले आहेत.

‘ओमायक्रॉन’बाबत राज्यात पूर्णपणे दखल घेतली जात असून मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८०० जणांची RTPCR चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. कर्नाटक सिमेवर सध्या कोणतेही निर्बंध घातले जाणार नसून केंद्र घेईल त्या निर्णयाप्रमाणे राज्य निर्णय घेईल असं आवाहन त्यांनी केलं आहे. याशिवाय नागरीकांनी काळजी घ्यावी असंही टोपे म्हणाले.

मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात १२ तर पुण्यातील लॅबमध्ये १६ असे एकूण २८ नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी देण्यात आले आहे. या नमुन्यांचे अहवाल अजून आले नाही. त्यामुळे या नमुन्यांचे अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नाही असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

नगर येथील शासकीय रुग्णालयातील आगीच्या घटनेचा अहवाल अजूनही आलेला नाही. हा अहवाल देण्यासंदर्भात मी विनंती करीन तेथील कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याच कारण नाही असही ते म्हणाले. ऑक्सीजन अभावी राज्यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. १ नोव्हेंबरनंतर राज्यात आलेल्या विमान प्रवाशांची यादी घेण्यात आली असून त्यांचं सर्व्हेक्षण करण्याचं काम सुरू असून, त्यांच्या संपर्कात आळलेल्याची तपासणी सुरु असल्याी माहिती टोपे यांनी यावेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/maharashtra/omicron-rtpcr-test-of-800-people-at-mumbai-airport-so-far-health-minister-tope-msr-87-2704833/