मुंबई बातम्या

मुंबई : सक्रिय रुग्णांच्या यादीत मुंबई पहिल्या स्थानावर – Sakal

मुंबई : राज्यात सक्रिय रुग्णांच्या यादीत मुंबई पहिल्या स्थानावर आली असून यावेळेस मुंबईने पुण्यालाही मागे टाकले आहे. राज्यातील 5 जिल्ह्यांत एकूण सक्रिय रुग्णांपैकी 76 टक्के सक्रिय रुग्ण असून मुंबई, पुणे, अहमदनगर, ठाणे आणि  रायगड या जिल्ह्यामधींल आहेत.

दरम्यान, राज्यात दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे, प्रशासनावरील भार सद्यस्थितीत कमी असला तरी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रासह मुंबईत दिवाळीचा उत्साह वाढला आहे. त्यातच राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत सक्रिय रुग्ण जास्त असून पहिल्या क्रमांकावर आहे.

मुुंबईत 4,503 सक्रिय रुग्ण नोंदले गेले आहेत, याचे प्रमाण 28.95 टक्के आहे. त्यापाठोपाठ पुण्यात 3,210 सक्रिय रुग्ण असून 20.64 टक्के प्रमाण आहे. अहमदनगरमध्ये 1,871 सक्रिय रुग्ण आहेत तर, ठाण्यात 1,618 (10.40) टक्के आणि रायगडमध्ये 623 रुग्ण असून 4.01 एवढे प्रमाण आहे.

हेही वाचा: पुणे : ताडीवाला रोड परिसरात नळ आहे, पण पाणी नाही !

राज्यात सध्या 15,119 सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या एक ते दोन महिन्यांपूर्वी दुप्पट होती. मात्र आता या एकूण संख्येत घट झाली आहे. संसर्ग नियंत्रणात ठेवायचा असल्यास कोविड प्रोटोकॉल पाळण्यावर भर देण्यास वारंवार सुचवले जात आहे. राज्यात 26 ऑगस्ट रोजी राज्यात 50 हजार 393 सक्रिय रुग्ण होते. तर यानंतर एक महिना उलटून म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी राज्यात 37 हजार 860 एवढी सक्रिय रुग्ण संख्या नोंद करण्यात आली. 25 ऑक्टोबर रोजी 23 हजार 184 सक्रिय रुग्ण संख्या नोंद करण्यात आली होती. आणि आता 15,119 एवढी सक्रिय रुग्णांची नोंद केली गेली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तिन्ही महिन्यात मुंबई सक्रिय रुग्णांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती मात्र या नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई पहिल्या क्रमांकावर आली आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-mumbai-tops-the-list-of-active-patients-psp05