मुंबई बातम्या

महाविद्यालये सुरू करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने काढले परिपत्रक | Mumbai university – Sakal

मुंबई : कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव (corona infection) राज्यात कमी झाल्याने बुधवारी, 20 ऑक्टोबरपासून विद्यापीठे (universities) आणि वरिष्ठ महाविद्यालये (colleges) सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) आपल्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना सुरू करण्यासाठी परिपत्रक (Circular) जारी केले आहे.

हेही वाचा: मुंबईला दिलासा; तिसर्‍यांदाही डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण नाही

यासाठी सर्व महाविद्यालयांनी कोविडच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि त्याची तयारी सुरू करावी असे आदेश, प्राचार्य, महाविद्यालयाना दिले आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मागील आठवड्यात राज्यातील सर्व पारंपारिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची सर्व महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर मुंबई व्विद्यापीठाने परिपत्रक काढून स्थानिक प्राधिकरणांना महाविद्यालये सुरु करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, त्यानुसार महाविद्यालयांनी संबंधित प्राधिकरणांशी संपर्क साधून याविषयी योग्य निर्णय घेण्यात यावा, असे सूचित केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणार आहे वरिष्ठ महाविद्यालय विविध शिक्षण संस्थांमध्ये दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात उपस्थितीत राहण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र ज्याचे एकही डोस पूर्ण झाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना डोस घेण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ संकुल परिसरात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. त्या दरम्यान घरी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी तयारी करण्यासाठीही विद्यापीठाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

Source: https://www.esakal.com/mumbai/corona-education-update-colleges-mumbai-university-circular-corona-impact-on-education-nss91