मुंबई बातम्या

लातूर-मुंबई रेल्वे सुरू ठेवा,एक्स्प्रेस गाड्या २८ तारखेपर्यंत बंद | Latur Mumbai Train – Sakal

लातूर : दौंड ते कुर्डूवाडी मार्गावरील भाळवणी वाशिंबे मार्गावर दुहेरीकरणाच्या काम सुरु आहे. त्यामुळे लातूर-मुंबई, बिदर-मुंबई या दोन्ही एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बंद ठेवण्यात (Latur-Mumbai Train) आल्या आहेत. सणासुदीत या रेल्वेगाड्या बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या रेल्वे नाशिकमार्गे सुरु ठेवाव्यात अशी मागणीचे पत्र खासदार सुधाकर शृंगारे (Latur MP Sudhakar Shrangare) यांनी मध्य रेल्वेला दिले आहे. दौंड ते कुर्डूवाडी मार्गावर सध्या काम सुरु आहे. त्यामुळे लातूर-मुंबई, बिदर-मुंबई या लातूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या (Latur) रेल्वे बंद ठेवल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात १४ दिवस बंद ठेवणे प्रवाशांवर अन्याय करणारे ठरणार आहे. त्यामुळे या रेल्वे लातूर रोड, परभणी, औरंगाबाद, मनमाड, नाशिकमार्गे सुरू ठेवाव्यात अशी मागणी खासदारांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: वाढती इंधन दरवाढ, त्यात डिझेल चोरी वाढली अन्

मुंबईला जाण्यासाठीच्या दोन्ही एक्स्प्रेस १४ ते २८ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. लातूरहून मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना रेल्वे उपलब्ध झाली पाहिजे. लातूर मतदारसंघातील लोकांना लातूरहुन मुंबईसाठी जाण्या-येण्यासाठी या रेल्वे महत्त्वाच्या आहेत. या रेल्वे सणासुदीच्या काळात रेल्वे बंद राहिल्यास जनतेतून नाराजी व्यक्त होऊ शकते. ते टाळण्यासाठी सध्याची लातूर-मुंबई व बिदर-मुंबई या दोन एक्सप्रेस रेल्वेगाड्या लातूर रोड, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिकमार्गे मुंबईला पाठवली तर प्रवाशांसाठी अधिक सोयीचे होईल असे मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Source: https://www.esakal.com/marathwada/keep-continue-latur-mumbai-train-from-14-to-28th-october-no-service-glp88